Virat Kohli Retirement : सगळं काही ठीक होतं, मग विराट कोहलीने कसोटी क्रिकेट का सोडलं?, जाणून घ्या
Virat Kohli Retirement Latest News In Marathi : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोमवारी दि.12 मे 2025 रोजी विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून निवृत्तीची घोषणा केली. 36 वर्षीय विराट कोहलीने या फॉरमॅटला अलविदा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे विराट कोहली अतिशय चांगला तंदुरुस्त होता, अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि इंग्लंड दौऱ्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असताना त्याने अचानक कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आणि सर्वांना आश्चर्यचा धक्का दिला. नेमकं काही तरी शिजत होते. यापूर्वी काही दिवसांपूर्वीच रोहित शर्माने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर काही दिवस देखील पूर्ण होत नाही तोच विराटने देखील हा निर्णय मोठ्या जड अंतकरणाने घेतला. त्याने भावनिक पोस्ट लिहून अखेर निवृत्ती घेतली.

विराट कोहलीने का घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती?
काही क्रीडातज्ज्ञांच्या मते, विराट कोहली याने घेतलेल्या निर्णयामुळे चाहत्यांना आश्चर्यचा धक्काच बसला आहे. गेल्या एका आठवड्यात बरेच काही असे घडले असावे कारण की, रोहित शर्माची निवृत्ती, आता विराट कोहलीची निवृत्ती. यातून एक गोष्ट लक्षात येते की, 2011 आणि 2012 सालातील त्या गोष्टींची आठवण करून देणारी ठरली आहे. जिथे सलग दोन कसोटी मालिका गमावल्यानंतर अनेक बड्या खेळाडूंनी निवृत्ती घेतली होती.
बीसीसीआय आणि क्रिकेटपटूंमध्ये संवादाचा अभाव?
दुसरी गोष्ट म्हणजे, बीसीसीआय आणि क्रिकेट पटूंमध्ये संवादाचा अभाव असल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही. कारण विराट कोहलीच्या मानसिकतेवरून आणि त्याच्या तयारीवरून तो इंग्लंडसाठी तयार असल्याचे आपल्या सर्वांना वाटते. पण अचानक असे काय झाले की विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटला सर्वोच्च मानणारा विराट कोहली तंदुरुस्तीच्या बाबतीत देखील सर्वात सर्वोच्च स्थानी आहे. एवढं काय झालं की, त्याने 10 हजार धावा देखील पूर्ण करण्याचा विचार केला नाही.
इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवृत्ती घेणे सर्वाधिक धक्कादायक
आयपीएलनंतर लगेचच टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर जावे लागणार आहे. ही मालिका खूप महत्त्वाची असणार होती. गेल्या एका आठवड्यात, विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा आपला हेतू बीसीसीआयला यापूर्वीच सांगितला होता. ज्यावर बोर्ड त्याला निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगत असल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या.
ब्रँड अॅम्बेसेडरनेच कसोटीतून निवृत्ती घेणे हा चिंतेचा विषय?
हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की विराट कोहली पुन्हा कसोटी संघाचा कर्णधार होऊ इच्छित असल्याच्या काही बातम्या आल्या होत्या, परंतु बीसीसीआय यासाठी तयार नव्हते. परंतु, या बातमीची कोणतीही पुष्टी देण्यात आलेली नाही. सध्या जागतिक क्रिकेटच्या फॅब-4 मध्ये समाविष्ट असलेल्या विराट कोहलीने सुमारे 7 वर्षे कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे आणि तो भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार देखील बनला आहे. अशा परिस्थितीत, कसोटी क्रिकेटवर खूप प्रेम करणाऱ्या आणि कसोटी क्रिकेटचा सर्वात मोठा ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या खेळाडूची अचानक निवृत्ती अनेक प्रश्न उपस्थित करते.












Click it and Unblock the Notifications