विराट कोहलीला BCCI ने T20 वर्ल्डकपचे दिले हे 'छोटे' बक्षीस! व्हिडिओ पहा, किंमत ऐकून बसेल धक्का!
Virat Kohli : भारताचा धुरंधर फलंदाज आणि सचिन तेंडूलकरच्या विश्वविक्रमाच्या जवळ पोहचलेला सुपरस्टार खेळाडू विराट कोहली त्याच्या कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी नेहमी चर्चेत असतो. विराट कोहली हा भारतीय संघाला मिळालेला एक हिराच आहे. त्याची बॅटिंग चाहत्यांना कायमच भुरळ घालत असते.
विराट कोहली नावात अशी जादू आहे की, त्याच्या प्रत्येक कृतीकडे चाहत्यांचे लक्ष असते. त्याला भक्कम पाठींबा ते देतात. अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओत बीसीसीआयने विराटला T20 वर्ल्ड कपचे एक बक्षीस दिले आहे.
बक्षीस दिसायला छोटे किंमत फारच मोठी!
टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर जे बक्षीस बीसीसीआय आपल्या खेळाडूंना देणार होते त्यात पहिला नंबर विराट कोहलीचा लागला आहे. त्याला बीसीआयने आयपीएलदरम्यानच त्याची भेट पाठवली आहे. ही भेट फारच मनमोहक आणि चमकदार आहे.

काय आहे विराटला मिळालेली ती भेट
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला त्याच्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये केलेल्या जोरदार कामगिरीचे बक्षीस म्हणून बीसीसीआय आणि ड्रीम 11 ने वैयक्तिक अंगठी दिली आहे. ही अंगठी फारच मनमोहक आणि चमकदार आहे, आता या बक्षीसाची चर्चा सोशल मीडियावर आहे.
कोहलीला मिळालेली भेटवस्तू किती रुपयांची?
विराट कोहलीला बीसीसीआयने ऐरी गैरी नाही तर चक्क हिऱ्याची अंगठी दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याची किंमत कोट्यवधी रुपये असू शकते पण हा फक्त अंदाज आहे, अजून या अंगठीची खरी किंमत अद्याप समोर आलेली नाही. या अंगठीची खरी किंमत किती आहे? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
व्हिडिओ व्हायरल
विराट आयपीएल 2025 मध्ये व्यस्त आहे, आरसीबी संघ आता या 18 व्या मोसमात कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे आहे. या आयपीएलदरम्यानच विराटला बक्षीस मिळाले आहे आणि या बक्षीसाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. विराट कोहलीच्या हातात निळ्या रंगाची मोठी अंगठी दिसत आहे. ज्याच्या मध्यभागी बीसीसीआयचा लोगो लावला आहे आणि त्याच्या आजूबाजूला हिरे आहेत. यासोबतच अंगठीच्या बाजूला विराट कोहलीची 'VK' अक्षरे लिहिली आहेत. हा त्याच्या जर्सी नंबरवर लिहिला आहे.
रोहित शर्मासोबतच्या नातेसंबंधावर विराट कोहलीचे विधान
RCB चॅनलवर त्यांच्या नात्याबद्दल बोलताना कोहली म्हणाला, 'एवढा वेळ एखाद्यासोबत खेळल्याने नैसर्गिकरित्या एक मजबूत नाते निर्माण होते, खासकरून जेव्हा तुम्ही एकमेकांकडून क्रिकेटबद्दल खूप काही शिकता. सुरुवातीच्या दिवसात आम्ही एकमेकांकडून सतत काहीतरी शिकत होतो आणि आमच्या करिअरमध्ये एकत्र वाढत होतो. आम्ही नेहमी विचारांची देवाणघेवाण करत होतो, प्रश्न विचारत होतो आणि खेळाच्या विविध पैलूंवर चर्चा करत होतो.
विराट पुढे म्हणाले, 'कालांतराने, आम्ही नेतृत्वाच्या भूमिकेतही एकत्र काम केले, जिथे आम्ही नियमितपणे रणनीती आणि कल्पनांवर चर्चा करायचो. एखाद्या विशिष्ट परिस्थितीसाठी किंवा सामन्यासाठी सर्वोत्तम दृष्टीकोन कोणता असू शकतो यावर अनेकदा आम्हा दोघांची मते समान होती. आपण एकमेकांवर विसंबून राहू शकतो हे जाणून आपल्या दोघांमध्ये असलेला विश्वास अमूल्य आहे.












Click it and Unblock the Notifications