Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

न्युझीलंविरुद्ध पराभवानंतर विराट-अनुष्कासोबत भक्तित तल्लीन! कृष्णादास यांच्या कीर्तनात पोहोचली जोडी

Virat Kohli and Anushka Sharma in KrishnaDas' kirtan : भारत आणि न्युझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. जवळपास 36 वर्षानंतर ही किमया न्युझीलंडने भारतीय भुमीत विजय साकारला. या सामन्यात विराट कोहली फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही. पहिल्या डावात तर त्याने भोपळाही फोडला नाही. आता या पराभवानंतर भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी तथा अभिनेत्री अनुष्का शर्मा हे एका कीर्तन कार्यक्रमात दिसले हे ऐकून नवल वाटून घेऊ नका पण ही गोष्ट खरीय.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे प्रेम फुलले, नंतर त्यांचा विवाहही झाला. आता हे जोडपे संसारात चांगलेच रममान झाले आहे. कुणालाही वाटेल की एवढे ऐश्वर्य असलेल्या जोडप्यांचे जीवन फारच निराळे असेल पण या दोघांचाही साधेपणा नेहमी दिसून येतो. कालच पाहा ना..ते कार्यक्रमात अगदी जमीनीवर बसून कीर्तन ऐकत होते.

Virat Kohli and Anushka Sharma in KrishnaDas  kirtan

कोहली-अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुंबईत कृष्णा दास कीर्तन कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघेही भक्तीमध्ये तल्लीन झालेले दिसत आहेत.

Virat Kohli and Anushka Sharma in KrishnaDas  kirtan

करवा चौथच्या रात्री कीर्तनात सहभाग

विराट आणि अनुष्का या जोडगळीने करवा चौथच्या रात्री या कीर्तन कार्यक्रमात सहभाग घेतला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दिसले. यावेळची त्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. शेअर केलेल्या क्लिपमध्ये दोघेही एकत्र बसलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे अनुष्का शर्मा ही तर परिपूर्ण भारतीय नारी दिसत आहे. साडी, बसण्याची पद्धती आणि हातात दोन हात ठेवून देवाच्या कीर्तनात तल्लीन झालेली ती दिसतेय. तिच्या चेहऱ्याची मुद्राही देवापुढे नतमस्तक असलेली दिसत होती.

Virat Kohli and Anushka Sharma in KrishnaDas  kirtan

3 महिन्यांपूर्वी लंडनमध्येही कीर्तनात हजेरी

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची कीर्तन ऐकण्याची पहिली वेळ नाही. हे दोघेही तीन महिन्यांपूर्वी लंडनमध्ये दास यांच्या कीर्तनालाही हजेरी लावली होती. या जोडप्याची अशा कार्यक्रमांतून अध्यात्म आणि त्याच्या आचरणांबद्दलची आस्था दिसून येते. धर्मातील तत्व आणि विचारही त्यांना आवडतात आणि ते अनुकरण करतात हेही स्पष्ट होते.

Virat Kohli and Anushka Sharma in KrishnaDas  kirtan

दुसऱ्या सामन्याची तयारी, विराट चमकेल का?

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट्सनी पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारतीय संघाच्या या पराभवानंतर संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो.

भारतीय संघाला उर्वरित सात सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे.पहिल्या डावात विराट अपयशी ठरला पण दुसऱ्या डावात त्याने 70 धावा केल्या, आता दुसऱ्या सामन्यात विराट चमकदार कामगिरी करणार का हे पाहायचे आहे. कीर्तनाची एकाग्रता आणि शांततेतून त्याच्या बॅटमधून स्फोटक फलंदाजी होते का हेही आगामी काळात समजेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+