Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ; पैलवानाने पंचांची काँलर ओढत मारली लाथ

अहिल्यानगरमध्ये झालेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ उडाला. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे याने पंचांची काँलर ओढून त्यांना लाथ मारल्याने एकच खळबळ उडाली. पंचांनी शिवराजला पराभूत घोषित केल्याने हा वाद झाला. वास्तविक आपले दोन्ही खांदे टेकलेले नव्हते. शिवाय आपण पंचांनी रिप्ले पाहण्याची विनंती केली त्याचे अपिलही टाकले मात्र तसे काहीच विचारात न घेता, मला पराभूत घोषित करण्यात आले, असा आरोप राक्षे याने केला.

Maharashtra Kesari Wrestling Tournament

नेमके काय झाले?

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅट विभागात पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. त्यात पृथ्वीराजने शिवराजला टांग डावावर खाली खेचले. त्यावेळी शिवराजची पाठ खाली टेकली म्हणून पृथ्वीराजला विजयी घोषित करण्यात आले. मात्र यावर शिवराजने आक्षेप घेतला. त्यानंतर वाद वाढला. याच वादातून शिवराजने भर स्टेजवर पंचांची काँलर ओढत त्यांना लाथही मारली. ही दृष्ये प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाली.

काय म्हणाला शिवराज

शिवराजला पराभूत घोषित करण्यात आल्यानंतर त्याचा राग अनावर झाला. याबाबत त्याने आपली प्रतिक्रिया दिली. मीडियासमोर बोलताना तो म्हणाला की, मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून हे मुद्दाम केले. माझी पाठ टेकलीच नव्हती. मी पंचांकडे निकाल देण्यापूर्वी कुस्तीचे व्हिज्युअल्स पहा अशी विनंती केली होती. मात्र माझे अपील फेटाळून लावले. अपील पाहिल्याशिवाय निर्णय देता येत नाही. मात्र माझे अपिल विचारात घेतले गेले नाही. त्यामुळे माझा राग अनावर झाला, असं शिवराजने कबूल केलं.

कोण ठरलं विजयी?

अहिल्यानगरध्ये महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मॅट विभागात पृथ्वीराज मोहोळ विजयी ठरला. माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापुरच्या महेंद्र गायकवाड याने साकेत यादवचा पराभव केला. त्यामुळे आता पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात महाराष्ट्र केसरीसाठी लढत होणार आहे. गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम फेरीची लढत झाली. या लढतीत पृथ्वीराज चव्हाण याने शिवराज राक्षेचा पराभव केला.

पोलिसांनी केली मध्यस्थी

या लढतीदरम्यान राक्षे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आम्हाला अंतिम निर्णय मान्य नसल्याचा पवित्रा राक्षे समर्थकांनी घेतला. पंचाच निर्णय चुकीचा असल्याचं राक्षे याने म्हटलंय. यावेळी संतप्त झालेल्या शिवराजने पंचाला लाथ मारल्याचं दिसून आलं. यावेळी पोलिसांनी हस्ततक्षेप करीत वाद मिटवला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+