U19 World Cup Final भारतीय संघाचा 411 धावांचा डोंगर; इंग्लडला तगडे आव्हान, बसला पहिला झटका
U19 World Cup Final : झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबवर आज भारतीय युवा संघाने क्रिकेट विश्वाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरले आहे. अंडर-१९ विश्वचषकाच्या खिताबी लढतीत भारताने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे हिमालयीन लक्ष ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात ४११ धावा चोपून काढल्या. अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमधील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
या कामगिरीसह इंग्लडला भारतीय १९ वर्षाखालील संघाने ५० षटकात ४१२ धावांचे आव्हान दिले आहे, हे सहजासहजी पार करण्यासारखे आव्हान नाही, त्यामुळे भारताचा विजय सोपा होईल अशी शक्यता चाहत्यांना आहे. यातच इंग्लडला पहिला धक्का बसला असून सलामीवीर जोसेफ मोर्स १६ चेंडूत १७ धावा करुन बाद झाला आहे. भारताच्या अंबरीशने जोसेफला त्रिफळाचीत केले.

१. वैभव सूर्यवंशीचे वादळ: मोडले अनेक विक्रम
भारताच्या या ऐतिहासिक धावसंख्येचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे सलामीवीर वैभव सूर्यवंशी. वैभवने सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने अवघ्या ८० चेंडूंमध्ये २१८.७५ च्या स्ट्राईक रेटने १७५ धावांची विष्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने १५ उत्तुंग षटकार आणि १५ खणखणीत चौकार ठोकले. विशेष म्हणजे, त्याने केवळ ५५ चेंडूत आपले शतक पूर्ण करून खळबळ उडवून दिली.
२. कर्णधार म्हात्रे आणि फलंदाजांची साथ
वैभवला दुसऱ्या बाजूने कर्णधार आयुष म्हात्रे याने ५३ धावांचे अर्धशतक झळकावून भक्कम साथ दिली. त्यानंतर अभिज्ञान कुंडू (४०), वेदांत त्रिवेदी (३२) आणि विहान मल्होत्रा (३०) यांनी छोटेखानी पण वेगवान खेळी करत धावसंख्या ४०० च्या पार नेली. अखेरच्या षटकांत कनिष्क चौहानने नाबाद ३७ धावांचे योगदान देत भारताला ४११ धावांपर्यंत मजल मारून दिली.
३. ऑस्ट्रेलियाचा जुना विक्रम मोडीत
अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतांविरुद्ध २५३ धावा केल्या होत्या. आज भारताने ४११ धावा करत तो विक्रम मोडीत काढला असून, फायनलमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.
४. इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई
इंग्लंडकडून जेम्स मीटोने ३ गडी बाद केले, तर सेबेस्टियन मॉर्गन आणि एलेक्स ग्रीन यांना प्रत्येकी २ बळी मिळाले. मात्र, भारतीय फलंदाजांच्या आक्रमणापुढे त्यांचा कोणताही डावपेच यशस्वी ठरला नाही.












Click it and Unblock the Notifications