भारत-पाक महामुकाबला होणार नाही! वर्ल्डकपचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी भारताचा पहिला सामना
U19 WC 2026 full Schedule in marathi IND vs-PAK Match Updates : युवा क्रिकेटपटूंचे भविष्य घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2026 चे संपूर्ण वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतेच घोषित केले आहे. 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 या काळात ही स्पर्धा झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळली जाणार आहे. मात्र, क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी निराशाजनक बातमी आहे - स्पर्धेच्या लीग टप्प्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणताही सामना होणार नाही.
युवा वर्ल्ड कपमध्ये एकूण 23 दिवसांत 41 सामने खेळवले जाणार आहेत. यात 16 संघांना चार-चारच्या गटात विभागण्यात आले आहे. मागील 2024 च्या वर्ल्ड कप प्रमाणेच यावेळेसही स्वरूप कायम ठेवण्यात आले आहे.

स्पर्धेची सुरुवात आणि भारताचे सामने
टूर्नामेंटची सुरुवात 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे आणि याच दिवशी भारताचा पहिला सामना USA (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) विरुद्ध बुलावायो येथे खेळला जाईल.
भारताच्या ग्रुप स्टेजमधील महत्त्वाचे सामने
15 जानेवारी: भारत vs USA (बुलावायो)
17 जानेवारी: भारत vs बांगलादेश (बुलावायो)
24 जानेवारी: भारत vs न्यूझीलंड (बुलावायो)
भारत-पाकिस्तान मुकाबला टळला
प्रत्येक आयसीसी (ICC) स्पर्धेतील सर्वात मोठा हाय-व्होल्टेज सामना म्हणून भारत-पाकिस्तान लढतीकडे पाहिले जाते. परंतु, यावेळी लीग टप्प्यात दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकमेकांविरुद्ध खेळणार नाहीत. 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'पहलगाम आतंकी हल्ल्या' नंतर देशात पाकिस्तानविरुद्धचे सामने आयोजित करण्यावर सातत्याने विरोध होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
स्पर्धेचे पुढील टप्पे आणि ठिकाणे
ग्रुप स्टेज संपल्यावर प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स टप्प्यात प्रवेश करतील. यानंतर सेमी-फायनल आणि 6 फेब्रुवारी रोजी हरारे येथे अंतिम सामना खेळवला जाईल. महत्त्वाचे म्हणजे, सेमी-फायनल आणि फायनल या तिन्ही मोठ्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
हरारे स्पोर्ट्स क्लब, टकाशिंगा स्पोर्ट्स क्लब (हरारे), क्वीन्स स्पोर्ट्स क्लब (बुलावायो) आणि नामीबिया क्रिकेट ग्राउंड व एचपी ओवल (विंडहोक, नामिबिया) या प्रमुख ठिकाणी सामने होणार आहेत.
क्रम दिनांक सामना ठिकाण
- १५ जानेवारी अमेरिका वि. भारत बुलावायो
- १५ जानेवारी झिम्बाब्वे वि. स्कॉटलंड हरारे
- १५ जानेवारी टांझानिया वि. वेस्ट इंडीज विंडहोक
- १६ जानेवारी पाकिस्तान वि. इंग्लंड हरारे
- १६ जानेवारी ऑस्ट्रेलिया वि. आयर्लंड विंडहोक
- १६ जानेवारी अफगाणिस्तान वि. दक्षिण आफ्रिका विंडहोक
- १७ जानेवारी भारत वि. बांगलादेश बुलावायो
- १७ जानेवारी जपान वि. श्रीलंका विंडहोक
- १८ जानेवारी न्यूझीलंड वि. अमेरिका बुलावायो
- १८ जानेवारी इंग्लंड वि. झिम्बाब्वे हरारे
- १८ जानेवारी वेस्ट इंडीज वि. अफगाणिस्तान विंडहोक
- १९ जानेवारी पाकिस्तान वि. स्कॉटलंड हरारे
- १९ जानेवारी श्रीलंका वि. आयर्लंड विंडहोक
- १९ जानेवारी दक्षिण आफ्रिका वि. टांझानिया विंडहोक
- २० जानेवारी बांगलादेश वि. न्यूझीलंड बुलावायो
- २० जानेवारी ऑस्ट्रेलिया वि. जपान विंडहोक
- २१ जानेवारी इंग्लंड वि. स्कॉटलंड हरारे
- २१ जानेवारी अफगाणिस्तान वि. टांझानिया विंडहोक
- २२ जानेवारी झिम्बाब्वे वि. पाकिस्तान हरारे
- २२ जानेवारी आयर्लंड वि. जपान विंडहोक
- २२ जानेवारी वेस्ट इंडीज वि. दक्षिण आफ्रिका विंडहोक
- २३ जानेवारी बांगलादेश वि. अमेरिका हरारे
- २३ जानेवारी श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया विंडहोक
- २४ जानेवारी भारत वि. न्यूझीलंड बुलावायो
- २४ जानेवारी ए४ वि. डी४ विंडहोक
सुपर सिक्स टप्प्यातील सामने
क्रम दिनांक सामना ठिकाण
- २५ जानेवारी सुपर सिक्स ए१ वि. डी३ विंडहोक
- २५ जानेवारी सुपर सिक्स डी२ वि. ए३ विंडहोक
- २६ जानेवारी बी४ वि. सी४ हरारे
- २६ जानेवारी सुपर सिक्स सी१ वि. बी२ बुलावायो
- २६ जानेवारी सुपर सिक्स डी१ वि. ए२ विंडहोक
- २७ जानेवारी सुपर सिक्स सी२ वि. बी३ हरारे
- २७ जानेवारी सुपर सिक्स सी३ वि. बी१ बुलावायो
- २८ जानेवारी सुपर सिक्स ए१ वि. डी२ हरारे
- २९ जानेवारी सुपर सिक्स डी३ वि. ए२ बुलावायो
- ३० जानेवारी सुपर सिक्स डी१ वि. ए३ हरारे
- ३० जानेवारी सुपर सिक्स बी३ वि. सी१ बुलावायो
- ३१ जानेवारी सुपर सिक्स बी२ वि. सी३ हरारे
- १ फेब्रुवारी सुपर सिक्स बी१ वि. सी२ बुलावायो
नॉकआउट टप्पा
क्रम दिनांक सामना ठिकाण
- ३ फेब्रुवारी पहिला सेमी-फायनल बुलावायो
- ४ फेब्रुवारी दुसरा सेमी-फायनल हरारे
- ६ फेब्रुवारी फायनल (अंतिम सामना) हरारे












Click it and Unblock the Notifications