आता फक्त ऋषभ पंतकडून भारताला अपेक्षा; दुसऱ्या डावातही पाच विकेट गमावल्या
AUS vs IND 2nd Test : भारत-ऑस्ट्रेलियाच्या कसोटी सामन्यात रंगत आली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचीच सरशी राहीली. आता भारतीय संघाला कमबॅक करण्याची उद्या शेवटची संधी आहे. उद्याचा दिवस भारताच्या हातून गेला तर या सामन्यात पराभव होण्याची शक्यता वाढली आहे.

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
पिंक बॉल कसोटीच्या पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीदेखील ऑस्ट्रेलियाचाच वरचष्मा राहिला. भारताने दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 337 धावांवर गुंडाळला. ट्रेव्हिस हेडचे शतक भारताला चांगलेच महागात पडले. शेवटच्या सत्रात भारतीय संघ फलंदाजीला उतरला, मात्र दिवसअखेर महत्वाच्या पाच विकेट्स भारताने गमावल्या.
भारतीय संघ गडगडला
भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आला, त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावात 157 धावांची आघाडी होती. भारताला सुरुवातीलाच एकामागून एक चार धक्के बसले. लोकेश राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. अवघ्या सात धावांवर तो बाद झाला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांची चांगली जोडी जमली. पण स्कॉट बॉलंडने यशस्वीला 24 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर विराट कोहलीने चौकारानिशी दमदार सुरुवात केली. मात्र तोही ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याला फक्त 11 धावा करता आल्या. कोहलीनंतर गिलने मोर्चा सांभळला मात्र तोही 28 धावांवर बाद झाला. गिलनंतर भारताला मोठा धक्का बसला. कारण कर्णधार रोहित शर्मा फक्त 6 धावांवर बाद झाला.
ऋषभ पंतकडून भारताला अपेक्षा
एकीकडे भारतीय संघाची पडझड सुरु असताना दुसरीकडे ऋषभ पंतने धडाकेबाज सुरुवात केली. भारतीयांच्या आशा त्याने कायम ठेवल्या. त्यामुळे भारती संघ आता तिसऱ्या दिवशी कशी फलंदाजी करतो, यावर सामन्याचा नूर ठरणार आहे. दुसऱ्या दिवस अखेर भारताची 5 बाद 128 अशी स्थिती आहे. यावेळी ऋषभ पंत (28) आणि नितीश कुमार रेड्डी (15) हे दोघेही आक्रमक क्रिकेट खेळत आहेत. भारत आता 29 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताला भारताला कमबॅक करण्याची तिसऱ्य दिवशी अखेरची संधी असणार आहे.












Click it and Unblock the Notifications