टीम इंडीयाने 11 वर्षानंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलंय
T20 world cup 2024 : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा फायनल सामना भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने साऊथ आफ्रिकाचा पराभव करून टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलंय आहे. अतिशय अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला.

विराट कोहलीच्या आक्रमक 76 धावा आणि अक्षर पटेलच्या दमदार 47 धावांच्या खेळीमुळे भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 176 धावा केल्या होत्या. तर साऊथ अफ्रिकाकडून हेन्रिक क्लासेनने 52 स्फोटक खेळी केली. पण हार्दिक पांड्याची घातक गोलंदाजी आणि सूर्यकुमार यादवच्या अफलातून कॅचने सामना तिथेच फिरला. बुमराहच्या गोलंदाजीसमोर साऊथ अफ्रिका चारी मुंड्या चित झाली अन् टीम इंडियाने 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. तसेच 17 वर्षानंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरलंय.
भारतीय संघाने 10 वर्षांचा आयसीसी ट्रॉफिचा दुष्काळ संपवत भारताने टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-20 चॅम्पियन ठरला.. भारताने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात आश्चर्यकारक विजय मिळवला आहे. रोहित शर्मा, हार्दिक पंड्यासारखे भारताच्या सर्वच खेळाडूंच्या डोळ्यातून विजयाश्रू आले.
शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने 146 कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले. 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन बनला होता. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने विजय मिळवत सर्वांचे स्वप्न साकारले. सामन्यातील अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने दमदार गोलंदाजी केली. भारताला विजयासाठी 6 षटकांत 16 धावांची गरज होती. तर मैदानात मिलर आणि केशव महाराजची जोडी होती. हार्दिकने फुलटॉस चेंडू टाकला जो मिलरने जोरदार फटका लगावला पण ब्रांडीवर उभा असलेल्या सूर्याने आश्चर्यकारक कॅच पकडला आणि भारताने सामना तिथेच फिरवला.












Click it and Unblock the Notifications