टीम इंडियावर दु:खाचा डोंगर; 'या' सदस्याच्या आईचे निधन, चॅम्पियन्स ट्रॉफीचा डाव अर्ध्यावर सोडला, अन्.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत आहे. तर फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ ताकदीने लढत आहेत. अशातच, भारतीय संघासाठी अतिशय दु:खदायक घटना घडली आहे.
भारतीय संघावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण, टीम इंडियातील महत्त्वाचा सदस्याची आईचे निधन झाल्याने त्याला तडकाफडकी सामना सोडून भारतात परतावे लागले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी मोहीम अर्ध्यावर सोडून त्याला घराकडे जावे लागले.

पुन्हा जबाबदारी स्विकारतील का?
भारतीय संघाचे व्यवस्थापक आर देवराज गुरू यांच्या आईचे रविवारी सकाळी निधन झाले. ही दुःखद बातमी मिळताच ते तातडीने हैदराबादला रवाना झाला. देवराज सध्या हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) चे सचिव देखील आहेत. भारतीय संघाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने क्रिकबझने या वृत्ताला दुजोरा दिला.
आजचा सामना भारताने जिंकला तर भारत फायनलमध्ये जाईल. त्यावेळी देवराज पुन्हा व्यवस्थापकीय जबाबदारी स्वीकारतील की नाही हे स्पष्ट नाही. आज मंगळवारी होत असलेल्या सामन्यासाठी देखील ते परतले नव्हते, अशी माहिती मिळत आहे.

हैदराबाद क्रिकेट संघटनेकडून दु:ख व्यक्त
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने एक निवेदन जारी करून शोक व्यक्त केला. त्यात संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, "आम्ही अत्यंत दुःखाने कळवत आहोत की आमचे सचिव देवराज यांच्या आई कमलेश्वरी गरू यांचे निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. देवराज गरू आणि त्यांच्या कुटुंबियां प्रती आमच्या संवेदना.'
अंतिम सामन्यात संघात सामील होऊ शकतात?
मॅनेजर आर देवराज गरू यांना सेमीफायनलमध्ये टीम इंडियासोबत सामील झाले नाही. परंतु जर भारताने आज सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले तर त्यांचा शेवटचा सामना 9 मार्च रोजी होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये जिंकणाऱ्या संघाशी असेल. जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर देवराज 9 मार्चपूर्वी टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. परंतु यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.












Click it and Unblock the Notifications