बरं झालं सूर्याच्या हातात झेल बसला, नाहीतर मी पुढे त्याला बसवले असते- रोहित शर्मा
मुंबई - बरं झालं सूर्याच्या हातात झेल बसला, नाहीतर मी पुढे त्याला बसवला असता असे वक्तव्य चक्क भारतीय विश्वविजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आज काढले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या, पण चिंता करु नका ते वक्तव्य अगदी मिश्किल होते आणि त्याला कारणही खास होते.

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंचा विधानभवनात आज स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. त्यावेळी रोहित शर्मा सत्काराला उत्तर देत होता.
#WATCH | Mumbai | Team India captain Rohit Sharma speaks in Maharashtra Vidhan Bhavan as Indian men's cricket team members are being felicitated by CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis
— ANI (@ANI) July 5, 2024
(Source: Maharashtra Assembly) pic.twitter.com/I51K2KqgDV
विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो झेल माझ्या हातात बसला असे वक्तव्य आज विधानभवनात आयोजित सत्कार समारंभात भारतीय खेळाडू सुर्यकुमार यादवने केले. त्यानंतर सत्कारपर भाषणासाठी आलेल्या रोहित शर्माने मिश्किल फटकेबाजी करत हे मिश्किल उत्तर दिले.
रोहित शर्मा म्हणाला, विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने झेल घेतल्यामुळेच भारतीय संघ विश्वविजेता ठरला. विधान भवनातील स्वागत समारंभामुळे आनंद झाला. काल मुंबईत चाहत्यांनी केलेले भरभरुन स्वागत स्वप्नवत होते.
11 वर्षानंतर आपण जगज्जेता बनलो...
11 वर्षानंतर आपण जगज्जेता बनलो. हे सर्व खेळाडूंमुळे शक्य झाले. सर्व खेळाडू उत्कृष्ट होते. विविध सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी वेगवेगळा खेळ केला त्यामुळे हे शक्य झाले.सूर्याने झेल हातात बसला असं म्हटलं त्यावर मी म्हणतो की, बरं झालं सूर्याच्या हातात बसला नाहीतर मी पुढे त्याला बसवला असता..असे वक्तव्य रोहित शर्माने करताच विधानभवनात एकच हशा पिकला.












Click it and Unblock the Notifications