T20 World Cup 2026: इंडियाची 'विजयी' भरारी! उपांत्य फेरीत पोहोचवणारे 'हे' 5 शिलेदार, वाचा सर्वकाही
T20 World Cup 2026 India semi final : गतविजेत्या भारतीय संघाने 2026 च्या टी-20 विश्वचषकात आपला दबदबा कायम राखत सहाव्यांदा उपांत्य फेरीत (Semi-Final) धडक मारली आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा प्रवास लीग स्टेजमध्ये निर्दोष राहिला, मात्र सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पराभवानंतर भारताचा मार्ग खडतर झाला होता. अशा 'करो या मरो' स्थितीतून भारताला बाहेर काढत टॉप-4 मध्ये पोहोचवण्यात पाच खेळाडूंनी सिंहाचा वाटा उचलला आहे.

खालीलप्रमाणे आहेत भारताच्या यशाचे ५ मुख्य 'हिरो'
१. संजू सॅमसन: 'करो या मरो' सामन्याचा तारणहार
कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झालेला सामना भारतासाठी अत्यंत कळीचा होता. वेस्ट इंडिजने उभारलेल्या १९५ धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना भारतावर दडपण होते. मात्र, सलामीला आलेल्या संजू सॅमसनने ५० चेंडूत नाबाद ९७ धावांची स्फोटक खेळी खेळून भारताचा विजय सुकर केला. सॅमसनने आतापर्यंत ३ सामन्यांत १४३ धावा ठोकल्या आहेत.
२. जसप्रीत बुमराह: पाकिस्तानचे कंबरडे मोडले
कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्ध रंगलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात बुमराहने आपल्या गोलंदाजीने दहशत निर्माण केली. १७६ धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला बुमराहने सुरुवातीलाच धक्के दिले. त्याने एकाच षटकात सैम अयुब आणि कर्णधार सलमान अली आगा यांना बाद करून पाकिस्तानची फलंदाजी विस्कळीत केली. भारताने हा सामना ६१ धावांनी जिंकून सुपर-८ मधील आपले स्थान पक्के केले.
३. इशान किशन: बॅटिंगमधील सातत्य
इशान किशन सध्या भारताचा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध मोक्याच्या वेळी ७७ धावांची आणि नामिबियाविरुद्ध ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर इशानने टिळक वर्मासोबत केलेली ८८ धावांची भागीदारी भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यात निर्णायक ठरली.
४. वरुण चक्रवर्ती: फिरकीचे मायाजाल
या विश्वचषकात वरुण चक्रवर्ती भारताचा 'ट्रम्प कार्ड' ठरला आहे. ७ सामन्यांत १२ बळी घेत तो भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. नामिबिया आणि नेदरलँड्सविरुद्ध प्रत्येकी ३ बळी घेत त्याने मधल्या षटकांत प्रतिस्पर्धी संघांना जखडून ठेवले. पाकिस्तानविरुद्धचे त्याचे २ बळीही तितकेच महत्त्वाचे होते.
५. हार्दिक पंड्या: अष्टपैलू कामगिरीचा धमाका
हार्दिक पंड्याने बॅट आणि बॉल दोन्ही आघाड्यांवर आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्याने ७ सामन्यांत १५६ च्या स्ट्राईक रेटने १७२ धावा केल्या असून त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीतही त्याने कमाल दाखवत ६ बळी टिपले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच षटकात साहिबजादा फरहानला शून्यावर बाद करून त्याने विजयाचा पाया रचला होता.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications