स्मृती मंधना भावूक! लग्नाचे नाते तुटल्यानंतर 3 महिन्यांनी तोडले मौन; पोस्टद्वारे मांडले 'ते' सत्य!
Smriti Mandhana emotional post : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना सध्या तिच्या मैदानावरील झंझावाती कामगिरीमुळे आणि मैदानाबाहेरील एका अत्यंत वैयक्तिक पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या T-20 सामन्यात 55 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिल्यानंतर, स्मृतीने सोशल मीडियावर एक 'रहस्यमय' पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

"स्मृतीची भावनिक पोस्ट काय?
मालिका विजयानंतर अवघ्या 24 तासांत स्मृतीने इंस्टाग्रामवर एक भावनिक आणि कटू सत्य मांडणारी स्टोरी शेअर केली. तिने लिहिले. "खेळाला तुमच्या भावनांची पर्वा नाही. हे एक कटू सत्य आहे. तुम्ही थकलेले आहात की नाही, तुम्ही अनुभवी आहात की नवीन, याने काहीच फरक पडत नाही. खेळाला फक्त एकाच गोष्टीची पर्वा असते, ती म्हणजे तुम्ही त्या दिवशी मैदानावर उतरून कशी कामगिरी करता." तिच्या या शब्दांमधून खेळाडूवर असलेले मानसिक दडपण आणि व्यावसायिक आयुष्यातील कठोरता स्पष्टपणे जाणवते.
वैयक्तिक आयुष्यातील वादळ; लग्न रद्द झाल्याची चर्चा
स्मृतीच्या या भावनिक उद्रेकाचे कारण तिचे वैयक्तिक आयुष्य असल्याचे मानले जात आहे. काही महिन्यांपूर्वी स्मृती आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या बातम्यांनी सोशल मीडिया गाजला होता. मात्र, ताज्या माहितीनुसार. नोव्हेंबर २०२५ मध्ये होणारे त्यांचे लग्न रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे. कौटुंबिक आरोग्य समस्या आणि काही वैयक्तिक मतभेदांमुळे या जोडीने आपले नाते संपवण्याचा कठीण निर्णय घेतल्याचे समजते. तीन महिन्यांच्या मौनानंतर स्मृतीने पुन्हा एकदा तिच्या भावनांना वाट करून दिली आहे.
"क्रिकेटच माझा आधार"; स्मृतीचे स्पष्टीकरण
मानसिक आरोग्याशी झुंज देत असताना क्रिकेटनेच तिला सावरल्याचे स्मृतीने मान्य केले. एका मुलाखतीत तिने सांगितले की, जेव्हा जेव्हा ती अस्वस्थ असते, तेव्हा बॅट हातात घेतल्यावर तिला शांत वाटते. "लोक माझ्या कामगिरीवरून माझे मूल्यमापन करतात, पण मी किती मेहनत घेतली यावरून मी स्वतःला पारखते. भारतीय जर्सी घातल्यावर इतर सर्व दुःख मी विसरून जाते," असे स्मृतीने म्हटले.
विजयात सिंहाचा वाटा
एकिकडे वैयक्तिक आयुष्यात कठीण काळ सुरू असतानाही, स्मृतीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आपल्या बॅटने उत्तर दिले आहे. ५५ चेंडूत ८२ धावांची तिची खेळी भारतासाठी निर्णायक ठरली. तिच्या या जिद्दीचे चाहते आणि क्रीडा विश्वातून मोठे कौतुक होत आहे.












Click it and Unblock the Notifications