फुलराणी सायना नेहवालचा घटस्फोट! पतीपासून वेगळे झाल्याची तिने स्वतः माहिती दिली; का घेतला घटस्फोट?
Saina Nehwal's divorce : भारताची दिग्गज बॅटमिंटनपटू सायना नेहवाल हिने एक धक्कादायक बातमी दिली आहे, तिने यासंदर्भात खुद्द माहिती दिली आहे. टेनिसस्टार सानिया मिर्झानंतर आता हैदराबादच्या सायनानेही घटस्फोट घेतला. त्यामुळे तिच्या चाहत्यासाठी ही वाईट बातमी आहे.सायनाने आपल्या घटस्फोटावर सोशल मीडियावर एक पोस्ट करुन यासंदर्भात भाष्य केले आहे.
एकीकडे तिचा पती कश्यप आणि सायना दोघेही बाहेर फिरताना दिसले आहेत आणि चाहत्यांनी या जोडप्यांबद्दल अनेक चांगल्या कमेंट्सही केल्या होत्या. पण लग्नाच्या सात वर्षांनंतर अचानक असे काय घडले की, दोघांचा घटस्फोट झाला. तिचे चाहते आता याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सायनाच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये घटस्फोटाच्या कारणांबद्दल काहीही सांगितले गेले नाही.

सायनाने लिहिले की कधीकधी जीवन आपल्याला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार आणि परस्पर समजुतीनंतर, कश्यप पारुपल्ली आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शांती, वाढ आणि आत्म-उपचार निवडले आहेत. हे स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी आहे असे सायनाचे म्हटले आहे.
हेही वाचा : Who is Saina Nehwal's husband: सायना नेहवालचा पती कोण? आहे फेमस खेळाडू, जिंकली आंतरराष्ट्रीय स्पर्धा
काय आहे सायना नेहवालची पोस्ट?
"आयुष्य आपल्याला कधीकधी वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते.
खूप विचार आणि विचार केल्यानंतर, मी आणि कश्यप पारुपल्ली यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, वाढ आणि उपचार निवडत आहोत.
मी आठवणींसाठी कृतज्ञ आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
या काळात आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि त्यांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद."
सायना नेहवालचा सात वर्षांचा संसार मोडला
सायना आणि कश्यप पारुपल्लीचे लग्न 14 डिसेंबर 2018 रोजी झाले. त्यांचे लग्न होऊन 7 वर्ष झाले होते. त्यानंतर अचानक त्यांच्या वेगळे होण्याची बातमी समोर आली. दोघांमध्ये कधीही मतभेद झाल्याचे वृत्त आले नाही. कश्यपने त्याच्या सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलेले नाही हे विशेष...!
कसे जुळले होते सायना आणि कश्यपचे लग्न?
सायना आणि पारुपल्ली कश्यप दोघेही हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होते. दोघेही तिथून एकमेकांना ओळखत होते. तिथून दोघेही प्रेमात पडले आणि लग्न केले. सायनाने ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले आणि ती जागतिक नंबर वन देखील होती. दुसरीकडे, कश्यपने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप चांगली कामगिरी केली.












Click it and Unblock the Notifications