Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Who is Saina Nehwal's husband: सायना नेहवालचा पती कोण? आहे फेमस खेळाडू, जिंकली आंतरराष्ट्रीय स्पर्धा

Who is Saina Nehwal's husband : भारताची फुलराणी, दिग्गज बॅटमिंटनपटू सायना नेहवालचा घटस्फोट झाल्याचे वृत्त आहे. तिच्यासंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर जारी झाली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मिडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर तिचं लग्न अन् संसार सात वर्ष टिकला असे म्हणावे लागेल.

भारताची दिग्गज टेनिसस्टार सानिया मिर्झानंतर आता हैदराबादच्या सायनानेही घटस्फोट घेतला. त्यामुळे तिच्या चाहत्याना या बातमीने दुःख झाले आहे. ही वाईट बातमी आहे. एकीकडे घटस्फोटाच्या बातम्या समोर येत असतानाच आता सायना नेहवालचा पती कोण आहे याचीही चर्चा होत आहे, आपल्यापैकी अनेक जणांना सायना नेहवालचा पती कोण आहे हे माहित नाही. चला आज आपण सायनाचा पती कोण आहे हे जाणून घेऊया.

Who is Saina Nehwal s husband

सायनाच्या पती कोण?

सायनाच्या पतीचे नाव परुपल्ली कश्यप आहे दोघेही अनेकदा बाहेर फिरायला जाताना दिसायचे. दोघांत कधीही वाद-विवादाच्या चर्चा नव्हत्या. पण आता त्यांच्या घटस्फोटाची बातमीच समोर आली आहे. चाहत्यांनी या जोडप्यांबद्दल सोशल मीडियावर अनेकदा भरभरुन कौतूक केले. पण आता लग्नाच्या सात वर्षांनंतर माशी कुठे शिंकली अन् दोघांचा घटस्फोट झाला हे लवकरच समजेल.

हेही वाचा : फुलराणी सायना नेहवालचा घटस्फोट! पतीपासून वेगळे झाल्याची तिने स्वतः माहिती दिली; का घेतला घटस्फोट?

कोण आहे परुपल्ली कश्यप?

परुपल्ली कश्यप याचा जन्म ८ सप्टेंबर १९८६ रोजी झाला असून तो एक भारतीय माजी बॅडमिंटन खेळाडू आहे. तो जागतिक सहाव्या क्रमांकाचा माजी खेळाडू आहे. तो सध्या गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रशिक्षक आहे. त्याला २०१२ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

परुपल्ली कश्यपने २०१३ मध्ये घडवला होता इतिहास

२०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. २०१४ च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले. २०१३ च्या आवृत्तीत कश्यप हा इंडियन बॅडमिंटन लीग संघ, बंगा बीट्सचा आयकॉन खेळाडू होता. बॅडमिंटनमधील पारुपल्ली कश्यपचे सर्वोच्च जागतिक रँकिंग एप्रिल २०१३ मध्ये सहावे होते.

मुळ कुठला आहे परुपल्ली कश्यप

गुंटूर येथील उदय शंकर आणि सुभद्रा अशी परुपल्ली याच्या आई-वडिलांची नावे आहेत. ११ वर्षांचा असताना कश्यप पारुपल्लीने पहिल्यांदा भारतातील हैदराबाद येथे एसएम आरिफने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात प्रवेश घेतला. त्याच्या वडिलांच्या नोकरीमुळे त्याचे कुटुंब वारंवार स्थलांतरित होत असे. बंगळुरूमध्ये राहत असताना, तो पदुकोण अकादमीमध्ये सामील झाला. २००४ मध्ये, ते हैदराबादला परतला.

परुपल्लीचे २०१८ मध्ये सायना नेहवालशी लग्न

सायना आणि कश्यप पारुपल्लीचे लग्न १४ डिसेंबर २०१८ रोजी झाले. त्यांचे लग्न होऊन सात वर्ष झाले होते. त्यानंतर अचानक त्यांच्या वेगळे होण्याची बातमी समोर आली आहे. दोघांमध्ये कधीही मतभेद झाल्याचे वृत्त आले नाही. कश्यपने त्याच्या सोशल मीडियावर यासंदर्भात काहीही पोस्ट केलेले नाही.

कसे जुळले होते सायना आणि कश्यपचे लग्न?

सायना आणि पारुपल्ली कश्यप दोघेही हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होते. दोघेही तिथून एकमेकांना ओळखत होते. तिथून दोघेही प्रेमात पडले आणि लग्न केले. सायनाने ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले आणि ती जागतिक नंबर वन देखील होती. दुसरीकडे, कश्यपने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप चांगली कामगिरी केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+