Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हरभजन- सायमंद वादाचं 'मंकीगेट' प्रकरण; त्यावेळी सचिनची साक्ष नसती तर...

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात अनेकदा स्लेजिंग पाहाला मिळते. त्यामुळे मैदानावर अनेकदा वादाला तोंड फुटताना दिसत आहे. अशाच एका गाजलेल्या मंकीगेट प्रकरणाची आठवण या ट्राँफी दरम्यान अनेकदा काढली जाते. काय होतं हे प्रकरण, काय होता हरभजनसिंग व सायमंड यांच्यातला वाद हेच आपण आज पाहूयात...

नेमकं काय होतं प्रकरण

हरभजन सिंग आणि अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स यांच्यात 2008 'मंकीगेट' प्रकरण गाजलं होतं. त्या वर्षी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची ही मालिका होती. त्यातील दुसऱ्या सामन्यात सायमंड आऊट झाला. पण या सिडनी कसोटीत हरभजन सिंगने वर्णभेदात्मक शेरेबाजी करीत माकड संबोधल्याचा आरोप सायमंड्सने केला. अर्थात हे आरोप हरभजनने फेटाळले होते. सामनाधिकारी माइक प्रॉक्टर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत हरभजनवर तीन सामन्यांची बंदी घालली.

Sachin

सचिनची साक्ष ठरली महत्त्वाची

परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हरभजनच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. त्यांनी असं काही झालंच नसल्याचं सांगत दौरा रद्द करण्याची धमकी दिली. नंतर या प्रकरणावर बीसीसीआयनं सुनावणी घेतली. या सुनावणीत सचिन तेंडुलकरने हरभजनकडून साक्ष दिली. सचिन तेंडुलकरची साक्ष महत्त्वाची ठरली आणि हरभजनसिंगरील बंद हटली. त्याला फक्त 50 टक्के मानधन कपातीची शिक्षा मिळाली.

भारतीय संघाने दिला होता इशारा

असभ्य भाषेत बोलल्याचा ठपका ठेवत आयसीसीने हरभजनवर तीन सामन्याची बंदी घातली. त्यानंतर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यावर सोडणार असल्याचं बीसीसीआयला कळवलं. हरभजन सिंहने असं कोणतेही वक्तव्य केलं नव्हतं, उलट सामन्यात अनेक निर्णय आमच्याविरोधात देण्यात आले होतं, असंही संघातील खेळाडूंनी बीसीसीआयला कळवलं. त्यानंतर भज्जीवरील बंदीचा निर्णय रद्द करीत अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल मानधनातील निम्मी रक्कम कापण्यात आली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+