"हे काय चाललंय!" रोहीत शर्माचे कर्णधारपद काढून घेताच हा क्रिकेटपटू संतापला, 'या' 2 दिग्ग्जावंर सवाल
Rohit sharma odi captaincy removed : भारतीय क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा असा धक्कादायक निर्णय झाला आहे, ज्याने तमाम चाहत्यांना आणि क्रिकेट पंडितांना चुप केले आहे! सलामीवीर रोहित शर्मा याच्या नेतृत्वाचा अध्याय बीसीसीआयने अपेक्षेपेक्षा लवकर संपवला आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा होताच हे स्पष्ट झाले आहे.

रोहितकडून वनडे (ODI) संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले असून, युवा आणि उदयोन्मुख फलंदाज शुभमन गिल याच्याकडे ही महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. हा अचानक आणि 'वेळेपूर्वी' घेतलेला निर्णय क्रिकेट व्यवस्थापन आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना टीकेचे मोठे धनी बनवत आहे. एका क्षणात कर्णधार बदलण्याच्या या कृतीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ माजली आहे!
मोहम्मद कैफचा संताप
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ या टीकाकारांमध्ये अग्रस्थानी आहे. कैफ याचे स्पष्ट मत आहे की, रोहित शर्माला २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत कर्णधारपदी कायम ठेवण्याची संधी मिळायला हवी होती. कैफ यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत रोहितच्या नेतृत्वाचा जोरदार बचाव केला. त्यांनी थेट निवड समितीला लक्ष्य करत म्हटले.
"रोहित शर्माने भारताला १६ वर्षे दिली आणि आपण त्याला कर्णधार म्हणून एक वर्षही देऊ शकलो नाही. १६ आयसीसी स्पर्धांमध्ये १५ सामने जिंकणारा आणि फक्त २०२३ चा वर्ल्ड कप फायनल हरणारा कर्णधार असतानाही हा निर्णय घेतला गेला.
हे काय चाललंय?"
आगरकर यांनी या निर्णयावर 'तीन्ही फॉरमॅटसाठी तीन कर्णधार ठेवणे अवघड आहे', असे 'धोरणात्मक' स्पष्टीकरण दिले होते, मात्र कैफ यांनी हे स्पष्टीकरण मान्य केलेले नाही. यावर कैफ संतापला आणि त्याने बीसीसीआय आणि निवड समितीला काही प्रश्न विचारले.
गिलबद्दल आक्षेप नाही, पण घाई का?
कैफ यांनी रोहितच्या नेतृत्वाखालील अलीकडच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच, रोहितने २०२४ टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती, याची आठवणही करून दिली. युवा खेळाडूंना घडवण्यात, शिकवण्यात आणि दबावाच्या परिस्थितीत मार्गदर्शन करण्यात रोहितने मोठी भूमिका बजावली, असे कैफ यांचे मत आहे. तरीही त्याला दूर करण्यात आले.
"शुभमन गिल तरुण आहे, नवीन आहे, तो चांगला कर्णधार बनू शकतो. पण प्रत्येक गोष्टीत इतकी घाई करण्याची काय गरज आहे?" असा त्याने स्पष्ट प्रश्न विचारला. भारतीय क्रिकेटमध्ये घेतलेल्या या निर्णयामुळे रोहित शर्माच्या समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून, येणाऱ्या काळात या वादावर अजून पडसाद उमटण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications