विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी का आलं? RCB VS PBKS फायलनमध्ये 20 व्या षटकात काय घडलं? वाचा हायलाईट्स
RCB won IPL 2025 final first time after 18 years : आयपीएल सीजन 18 चा विजेता राॅयल चॅलेंजर बंगळुरू ठरला. पंजाब किंग्जचा अवघ्या सहा धावांनी पराभव करुन या संघाने आयपीएल ट्राॅफीवर आपले नाव कोरले. गेल्या अठरा वर्षात आयपीएलमध्ये बंगळुरू संघाला एकदाही विजेतेपद पटकावता आले नव्हते. गेल्या अठरा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच राॅयल चॅलेंजर बंगळुरूने हे विजेतेपद पटकावले आहे. या विजयाचे खरे शिल्पकार पुर्ण संघ आहे, कारण ऐनवेळी खूप चांगली कामगिरी या संघाने केली.

अहमदाबादमध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 3 जून 2025 रोजी रात्री सामना झाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबीने इतिहास रचून ट्रॉफी जिंकली आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने 9 विकेटवर 190 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब फक्त धावा करू शकला आणि सामना धावांनी गमावला.
18 वर्षांची प्रतिक्षा संपली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने अखेर 18 वर्षांची प्रतीक्षा संपवत आयपीएल 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. विराट कोहली सुरुवातीपासूनच आरसीबी संघासोबत आहे. यावेळी आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन बनला. हा विजय विराट कोहलीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण ठरला.
सामन्याचे हायलाईट्स
- अंतिम सामना अहमदाबादमधील जगप्रसिद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला, येथे आरसीबीने पंजाब किंग्जचा फक्त सहा धावांनी पराभव केला. क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध अर्धशतक झळकावणारा फिल साल्ट या सामन्यात फलंदाजीने काही खास दाखवू शकला नाही.
- बंगळुरूला पहिला धक्का 18 धावांवर बसला. काइल जेमिसनने फिल साल्टला श्रेयस अय्यरने झेलबाद केले. तो नऊ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने फक्त 16 धावा काढू शकला.
- सातव्या षटकात बंगळुरूचा स्कोअर 56 होता तेव्हा त्यांना दुसरा धक्का बसला. चहलने मयंक अग्रवालला अर्शदीप सिंगने झेलबाद केले. मयंकने 18 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकारासह 24 धावा काढल्या. या महत्त्वाच्या विकेटने बंगळुरूची फलंदाजी लाईन कमकुवत केली.
हेझलवूड- कोहलीची मंद पण संयमी खेळी
- 3 विकेट पडल्यानंतर विराट कोहली मैदानात उभा राहिला पण धावा मंद गतीने आल्या, तो पन्नाशीच्या जवळ गेल्यानंतर 35 चेंडूत 43 धावा करून बाद झाला, कोहली व्यतिरिक्त, रजत पाटीदारने 26, लिव्हिंगस्टोनने 25 धावा केल्या. नंतर जितेश शर्माने 10 चेंडूत 24 धावांची तुफानी खेळी खेळली, शेवटी आरसीबी 9 विकेटमध्ये 190 धावा करू शकला. पंजाबसाठी अर्शदीप आणि जेमीसनने ३-३ विकेट घेतल्या.
- धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली, मात्र शंभर धावा झाल्यानंतर पंजाबच्या फलंदाजांनी विकेट सोडल्या, पहिल्या दहा षटकात हा संघ विजेतेपद पटकावेल असे वाटत असताना अकरा ते पंधरा षटकापर्यंतचा खेळ मंदावला, त्यादरम्यान शशांकने चांगली फटकेबाजी केली.
- यादरम्यान पुन्हा एकाच षटकात दोन गडी बाद झाल्यानंतर पंजाबच्या फलंदाजांनी अक्षरशः विकेट फेकल्या, दिडशे धावांत त्यांचे सहा फलंदाज बाद झाले तर दुसरीकडे शशांक आपले कसब दाखवत बंगळुरुविरुद्ध लढा देत होता.
पंजाब सहा धावांनी हरला
शशांकने चांगली बॅटींग करत फलंदाजीचे एक टोक भक्कम ठेवले पण त्याला अपेक्षित साथ इतर फलंदाजांची मिळाली नाही. शेवटच्या षटकात 29 धावा हव्या असताना शशांकने चांगली फटकेबाजी केली पण शेवटी पराभव अवघ्या सहा धावांनी मानावा लागला.
विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी
सामन्याच्या शेवटच्या षटकात जेव्हा 29 धावा हव्या होत्या तेव्हा पहिला आणि दुसऱ्या चेंडूवर पंजाबचे फलंदाज फार काही करु शकले नाही तेव्हाच बंगळुरूचा विजय झाला हे स्पष्ट झाले तेव्हा विराटच्या डोळ्यात पाणी आले. हा विजयी सोहळा पाहण्यासारखा होता.












Click it and Unblock the Notifications