अश्विनने अचानक निवृत्ती का घेतली याबाबत स्वत : केला खुलासा
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटीनंतर अश्विनने ही घोषणा केली . निवृत्तीनंतर याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रियाही दिली नव्हती आणि पत्रकार परिषदेत निवृत्तीची घोषणा करून दुसऱ्याच दिवशी तो भारतात परतला होता. त्यावेळी याचे कारणही त्यांनी दिले नव्हते.
आता अश्विनने स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे. त्याने नासिर हुसेन आणि मायकेल आथर्टन यांच्याशी बोलून आपल्या निवृत्तीबद्दल भाष्य केलं आहे. अश्विन म्हणाला की, तुम्ही नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारता, माझा हा निर्णय योग्य आहे का? माझी केस वेगळी होती आणि ती कशी मांडायची हे मला कळत नव्हते. मला कधीही असुरक्षित वाटले नाही. मी कधीही गोष्टींना धरून राहणारा व्यक्ती राहिलो नाही. असा विचार करू नका की, आज माझा आहे, उद्या देखील माझा असेल.

फोटो सौजन्य- पीटीआय
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा सातवा गोलंदाज असल्याबद्दल अश्विनलाही प्रश्न विचारण्यात आला. तू समाधानी आहे का? यावर अश्विनचे उत्तर होते की, मी सातव्या क्रमांकावर फार काळ राहणार नाही. कारण नॅथन लियॉन मला मागे सोडेल. आठव्या क्रमांकावर असलो तरी मला आनंद होईल.
पुढे बोलताना अश्विन म्हणाला की, खेळ नेहमीच माझ्या पुढे राहतो. मला वाटले की, ज्या दिवशी मला असे वाटेल की, माझ्या कौशल्यांना भविष्य किंवा दिशा नाही असे वाटेल, तेव्हा मी हा खेळ सोडेन. मी नेहमी गोष्टी सोप्या ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
अश्विनने आपल्या कारकिर्दीत 106 कसोटी सामने खेळले आणि एकूण 537 विकेट घेतल्या. नॅथन लिऑन अजूनही त्याच्या मागे आहे पण हे अंतर खूपच कमी आहे. अश्विनला मागे टाकण्यासाठी लायनला फक्त 5 विकेट्सची गरज आहे. 538वी विकेट घेताच तो त्याला मागे टाकेल.












Click it and Unblock the Notifications