7वीत असताना प्रेम, सीएसकेने दोघांना एकत्र आणलं, मग अशी सुरु झाली अश्विन आण्णाची लव्हस्टोरी
Ravichandran Ashwin Love Story: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्ती घेताना तो खूपच भावूक दिसत होता.
आपल्या चमकदार कारकिर्दीनंतर अश्विनने क्रिकेटला अलविदा करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. रविचंद्रन अश्विनची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली होती, पण त्याची पत्नी प्रीती नारायण नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. पती आणि संघाला पाठिंबा देण्यासाठी ती अनेकदा स्टेडियममध्ये पोहोचते.

अश्विनची क्रिकेट कारकीर्द जितकी चमकदार होती तितकीच त्याची लव्हस्टोरी रंजक आहे. अश्विनची पत्नी प्रीती नारायण यांनी एकदा सांगितले होते की, त्यांची लव्हस्टोरी त्यांच्या शालेय दिवसांपासून सुरू झाली होती, जी आज एक मजबूत आणि प्रेमळ नातेसंबंधात बहरली आहे.
प्रीती अश्विनची शाळेतील क्रश
एका कार्यक्रमात प्रीतीने सांगितले होते की, रविचंद्रन अश्विन आणि प्रीती नारायण एकाच शाळेत शिकत होते, जिथे अश्विन पहिल्या नजरेत प्रितीच्या प्रेमात पडला होता. अश्विनचा प्रीतीवर क्रश आहे हे शाळेतल्या सगळ्यांनाच माहीत होतं, पण तो त्याचं प्रेम व्यक्त करू शकला नाही. नंतर क्रिकेटमुळे अश्विनला शाळा बदलावी लागली, पण तो प्रितीला भेटण्यासाठी निमित्त शोधत राहिला.
7 वीत असताना पहिल्यांदा भेट
7 वीत असताना अश्विन आणि प्रीतीची शाळेत भेट झाली होती. अश्विनचा प्रितीवर क्रश होता, तर प्रीतीही त्याला मनापासून आवडू लागली. शाळा आणि कॉलेजनंतर अश्विनने पूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले, तर प्रीती एका इव्हेंट कंपनीत काम करू लागली. या काळात दोघांनाही वेळ मिळाला की,ते एकमेकांना भेटायचे मात्र तोपर्यंत अश्विनने प्रीतीला प्रपोज केले नव्हते.
10 वर्षांनंतर व्यक्त केल्या भावना
अश्विन आणि प्रीती आपापल्या कामात व्यस्त होते. अश्विनला चेन्नई सुपर किंग्जमध्ये संधी मिळाली, तर प्रीती सीएसकेसाठी सोशल मीडिया हँडल हाताळत होती. CSK च्या एका कार्यक्रमात एक संधी मिळाली आणि यावेळी अश्विनने मनापासून बोलण्याचा निर्णय घेतला. 10 वर्षांच्या मैत्रीनंतर त्याने प्रीतीकडे प्रेम व्यक्त केलं.
2013 मध्ये विवाह बंधनात अडकले
शालेय मैत्री आणि प्रेमानंतर अश्विनने 2013 मध्ये प्रीतीशी लग्न केले. लग्नानंतर प्रीतीने सांगितले की तिच्या आणि अश्विनमध्ये अजूनही मैत्रीपूर्ण प्रेम आहे. दोघेही एकमेकांशी खूप भांडतात आणि खूप प्रेम करतात. प्रीती आणि अश्विन हे दोन मुलींचे पालक आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचा जन्म 2015 मध्ये झाला, तर धाकट्या मुलीचे नाव आध्या आहे. अश्विनचे सामने पाहण्यासाठी प्रीती अनेकदा आपल्या मुलींसोबत क्रिकेट स्टेडियमवर येत असते.












Click it and Unblock the Notifications