Ranji Trophy 2024 :विराट कोहली क्लिन बोल्ड! पदार्पणातच 22 धावत 6 विकेट्स घेणारा तो नवखा गोलंदाज कोण?
Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफी 2024 ची धुम सुरु असतानाच पदार्पणाच्या सामन्यात एका गोलंदाजाने चमकदार कामगिरी केली आहे. विराट कोहलीसारख्या जगद् विख्यात खेळाडूला क्लिन बोल्ड तर केलेच पण हा गडी इतक्यावरच थांबला नाही. चेतेश्वर पुजाराचीही विकेट घेतली आणि अवघ्या 22 धावांत 6 बळी घेतले. अशी कामगिरी कोणत्या गोलंदाजाने केली हा औत्सुक्याचा विषयच म्हणावा लागेल.
गुर्जपनीत सिंग असं या गोलंदाजाचे नाव तो रणजी करंडक पदार्पणाच्या सामन्यातच चमकला आहे. रणजी ट्रॉफी 2024 मध्ये सौराष्ट्र आणि तामिळनाडू संघ आमनेसामने होते. या सामन्यात गुरजपनीत सिंग हा पदार्पणाचाच रणजी सामना होता, यात त्याची कामगिरी अशी झाली की तो भारताचा आगामी सितारा होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्या दमदार कामगिरीमुळे तामिळनाडूने हा सामना एक डाव आणि 70 धावांनी जिंकला.

पहिल्या डावात शून्य, दुसऱ्या डावात 6 जण तंबुत पाठवले
गुरजपनीत सिंगला आपल्या रणजीच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही. मात्र दुसऱ्या डावात त्याने जी कामगिरी केली ती अफलातूनच होती. यात त्याची जादू पाहायला मिळाली. लोक तोंडात बोटे घालतील अशी किमया त्याने साधली.
अशा घेतल्या सहा विकेट्स
चिराग जानीच्या रूपाने त्याने पहिली विकेट घेतली. यानंतर सिंगने चेतेश्वर पुजारालाही बाद केले. मात्र, त्याने मोठ्या नावाच्या फलंदाजाला बाद करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गुर्जपनीतने भारतीय संघाचा मात्तब्बर फलंदाज विराट कोहलीलाही बाद केले आहे. त्याच्या 14 षटकांच्या स्पेलमध्ये त्याने 22 धावांत 6 बळी घेतले.
गुरुजपनीत सिंगला दिला कोहलीने सल्ला
गुरजपनीत सिंगने इंडियन एक्स्प्रेसला सांगितल्यानुसार, 'जेव्हा मी त्याला गोलंदाजी केली तेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं पण त्यानंतर पुन्हा त्याच्याकडे पाहण्याची हिम्मत झाली नाही.' कोहलीला बाद केल्यानंतर गुरजपनीत सिंगने आनंद साजरा केला नाही. मात्र, यानंतर कोहलीने स्ट्रेट ड्राइव्हने प्रत्युत्तर दिले. या सर्व प्रकारानंतर किंग कोहलीने युवा वेगवान गोलंदाजाला सल्ला दिला.
चेतेश्वर पुजाराला बाद केल्यानंतर गुरुजपनीतची प्रतिक्रीया
गुर्जपनीत म्हणाला, 'चेतेश्वर पुजारासारख्या मोठ्या फलंदाजाला जेव्हा गोलंदाजी करायची असते तेव्हा सुरुवातीपासूनच योग्य चेंडू टाकला पाहिजे. या फलंदाजाला बॅकफूटवर ढकलणे आणि नंतर त्याला अस्वस्थ करण्यासाठी एक चांगला चेंडू पुढे टाकण्याची आपली योजना होती असेही तो म्हणाला. गुरजपनीत सिंह 17 व्या वर्षी पंजाबमधील अंबाला सोडून चेन्नईला आला. त्याला क्रिकेटर बनायचे होते त्यासाठी तो तामीळनाडूत आला. चेन्नईत पदवीचे शिक्षण घेण्यासाठी तो चेन्नईत आला.












Click it and Unblock the Notifications