आर आश्विनला थेट मोदींचे पत्र; भावनिक होत म्हणाले, 'तो' वाईड बाँल आमच्यासाठी...
टीम इंडियाचा फिरकीपटू आर. आश्विनने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केली. आता फक्त देशांतर्गत व लीग स्पर्धेत तो खेळताना दिसेल. आश्विनने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सगळ्याच दिग्गज खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या. मात्र आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला दिलेल्या शुभेच्छा चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

काय म्हणाले पंतप्रधान
रविचंद्रन अश्विनला शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी त्याला भावनिक पत्र लिहिले आहे. ते म्हणाले, 'तुम्ही तुमच्या चांगल्या समज आणि योगदानासाठी ओळखले जाल. 2022 च्या T20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या चेंडूवर मारलेल्या शॉटला खूप टाळ्या मिळाल्या. ज्या पद्धतीने तुम्ही बॉल सोडला. तो वाईड बॉल बनू देणे हे तुमचे चातुर्य दर्शवते. जेव्हा तुझ्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला, तो क्षण आम्हा सर्वांना आठवतो. तुम्ही मैदानात परतलात. जेव्हा चेन्नईमध्ये पूरस्थिती होती आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाशी संपर्क साधू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तुम्ही ज्या प्रकारे खेळलात ते या खेळाप्रती तुमची बांधिलकी दर्शवते. जर्सी क्रमांक 99 ची अनुपस्थिती लोकांना नेहमीच जाणवेल. जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले तो क्षण क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षात राहतील.'
आश्विनचं केलं कौतूक
आपल्या पत्रात मोदीजी म्हणाले, 'तुमच्या सर्व 765 विकेट खास होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्कार मिळणे हे दर्शवते की, गेल्या काही वर्षांत संघाच्या यशावर तुमचा काय प्रभाव राहिला आहे. एकाच सामन्यात शतक झळकावून आणि पाच विकेट्स घेऊन तुम्ही तुमच्यातील अष्टपैलू क्षमता अनेक वेळा दाखवून दिली. 2021 मध्ये सिडनी येथे खेळलेल्या धाडसी मॅच सेव्हिंग इनिंगसह, बॅटनेही आपण आपल्या देशाला अनेक अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत.'












Click it and Unblock the Notifications