'पहलगाम हल्ल्यासाठी न्याय मिळालाच पाहिजे'; कोहली भावूक झाला, तर अनुष्का शर्मा काय म्हणाली?
Virat Kohli and Anushka Sharma on Pahalgam Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आतंकवाद्यांना सोडणार नाही, असा थेट इशारा दिला आहे. या घटनेनंतर आता सर्वत्र तीव्र दु:ख व्यक्त केले जात आहे. या घटनेवर बॉलीवूड स्टार तसेच क्रिकेटपटूंनी देखील दु:ख व्यक्त करत या हल्ल्यातील मृत्यू झालेल्या परिवारांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विराट कोहली काय म्हणाला?
विराट कोहलीने पहलगाम हल्ल्याबाबत इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. कोहलीने लिहिले- पहलगाममधील निष्पाप लोकांवर झालेल्या या भयानक हल्ल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना. या हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना शांती आणि शक्ती मिळो आणि या क्रूर हल्ल्यासाठी न्याय मिळाला पाहिजे.

अभिनेत्री अनुष्का शर्मानेही केली भावना व्यक्त!
विराट कोहलीची पत्नी तथा अभिनेत्री अनुष्का शर्मानेही या हल्ल्याबाबत एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. अनुष्काने लिहिले- काश्मीरमधील पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे माझे मन खूप दुःखी आहे. पीडितांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहेत आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. हा एक भयानक हल्ला आहे जो कधीही विसरता येणार नाही.
कधी व कुठे झाला होता हल्ला?
मंगळवारी पहलगाम येथील प्रसिद्ध बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ला झाला. जिथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता, ज्यामध्ये 28 लोक ठार झाले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माची ही इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि त्याचे चाहते ही पोस्ट खूप शेअर करत आहेत.
नीरज चोप्रा तसेच पीव्ही सिंधूनेही व्यक्त केली भावना?
दोन ऑलिंपिक पदक विजेत्या नीरज चोप्रा आणि पीव्ही सिंधूसह क्रीडा जगताने पहलगाममधील प्राणघातक दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आणि त्याचा तीव्र निषेध केला. चोप्रा यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, 'जम्मू आणि काश्मीरमधील दुःखद हल्ल्याने मन दुखावले आहे. मी पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो.
पहलगाम हल्ल्यानंतर आयपीएलमध्ये मोठे चार बदल?
पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आयपीएलमध्ये आज होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात चार मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. बीसीसीआयच्या वतीने हे मोठे चार बदल करण्यात आले आहेत.












Click it and Unblock the Notifications