PAK vs BAN : पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराचे भारताला आव्हान?, काय म्हणाला शां

PAK vs BAN : बांगलादेश क्रिकेट संघासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा व ऐतिहासिक ठरला आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जिंकून बांगलादेशाने इतिहास रचला आहे. यापूर्वी बांगलादेशाने पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत केलेले नव्हते. तर आज त्यांनी 2-0 ने पहिल्यांदाच विजय मिळवला आहे.

पाकिस्तानमध्ये खेळल्यानंतर आता बांगलादेश संघाला भारत दौऱ्यात खेळण्यासाठी यावे लागणार आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतोने भारताविरुद्धच्या मालिकेबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. मेहदी हसनच्या गोलंदाजीबाबत वक्तव्य करून शांतोने एक प्रकारे भारताला सावध होण्याचा इशारा दिला आहे.

मेहदी भारताविरूद्धही कामगिरी करेल

नजमुल हसन शांतो म्हणाला की, पुढील मालिका भारताविरुद्ध आहे, जी आमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. हा विजय आम्हाला खूप आत्मविश्वास देईल. मेहदीने या परिस्थितीत ज्या पद्धतीने गोलंदाजी करत 5 बळी घेतले ते खूपच प्रभावी आहे. भारताविरुद्धही तो अशीच कामगिरी करू शकेल, अशी आम्हाला आशा आहे.

najmul shanto

वेगवान गोलंदाजांची वर्क एथिक चांगली

पाकिस्तानमधील विजयाबाबत नजबुल हसन म्हणाला की, आम्हाला या ठिकाणी जिंकायचे होते आणि प्रत्येकाने ज्या पद्धतीने आपले काम केले त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आमच्या वेगवान गोलंदाजांची वर्क एथिक खूप चांगली होती आणि त्यामुळेच आम्हाला त्याचे फळ मिळाले. प्रत्येकजण स्वतःशी प्रामाणिक आहे आणि त्यांना जिंकायचे आहे, मला आशा आहे की ते जिंकत राहतील.

भारत दौऱ्याबद्दल बोलताना शांतो म्हणाला की, ही एक अतिशय महत्त्वाची मालिका असेल. येथील विजयाने आत्मविश्वास मिळतो पण आमच्याकडे मुशफिकुर रहीम आणि शकिब अल हसन हे दोन अनुभवी खेळाडू आहेत, हे दोघेही भारतासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत.

भारत बांगलादेश कसोटी मालिका

बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्या मालिकेतील दोन्ही सामने भारतासाठीही खास असतील कारण ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+