क्रिकेटर मोहम्मद शमीच्या मनात आला होता आत्महत्येचा विचार! मित्राने केला धक्कादायक खुलासा
मुंबई - मोहम्मद शमीने आज क्रिकेट जगतात जे नाव निर्माण केले आहे ते त्याच्या मेहनतीमुळे आहे. शमीचा प्रवास आव्हानांनी भरलेला आहे. गेल्या तीन एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत तो भारताचा आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज होता, पण गेल्या काही वर्षांत त्याचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले आहे.
शमी आत्महत्येचा विचार का करत होता?
शमी आत्महत्येचा विचार करत होता का? वास्तविक शमीने त्याची पत्नी हसीन जहाँपासून विभक्त झाला होता कारण तिने त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराची पोलिस तक्रार दाखल केली होती. त्याने शमीवर पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेऊन मॅच फिक्सिंग केल्याचा आरोपही केला होता.

शमीला अधिकाऱ्यांनी या आरोपांपासून मुक्त केले असले तरी, त्याचा मित्र उमेश कुमार याने शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर खुलासा केला की त्या काळात शमीने आत्महत्येचा विचार केला होता.
आरोपानंतर शमीला मोठा धक्का
या आरोपानंतर शमीला मोठा धक्का बसला आहे, असे उमेशने पॉडकास्टवर सांगितले की, त्यावेळी शमी प्रत्येक गोष्टीशी लढत होता. तो माझ्या घरी माझ्यासोबत राहत होता. पण जेव्हा पाकिस्तानवर फिक्सिंगचे आरोप झाले आणि त्याच रात्री तपास झाला तेव्हा तो तुटला. मी सर्व काही सहन करू शकतो, पण माझ्या देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप सहन करू शकत नाही, असे ते म्हणाले.
शमीच्या कारकिर्दीतील ती रात्र सर्वात मोठी
शमीला आयुष्य संपवायचे होते, तो म्हणाला, 'त्या रात्री त्याला काहीतरी मोठे करायचे होते. तो 19 वा मजला होता, ज्यावर आम्ही राहत होतो. मी पहाटे 4 च्या सुमारास पाणी पिण्यासाठी उठलो. मी किचनच्या दिशेने जात होतो, तो बाल्कनीत उभा असल्याचे मला दिसले. यावरुन काय होणार होते ते मला समजले. मला वाटते ती शमीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी रात्र होती.
फोनवर शमीला क्लिन चिटचा मॅसेज
शमीच्या आयुष्याला नवे वळण मिळाले, तो पुढे म्हणाला की, एके दिवशी आम्ही बोलत होतो, तेव्हा त्याला फोनवर मेसेज आला की त्याला या प्रकरणाच्या चौकशी समितीकडून क्लीन चिट मिळाली आहे. विश्वचषक जिंकून त्याला त्यादिवशी जास्त आनंद झाला असता. शमीने त्याचा संघर्ष आणि त्यादरम्यान त्याच्यासोबत घडलेल्या घटनांबद्दलही सांगितले.












Click it and Unblock the Notifications