Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

श्रेयस, हार्दीक पांड्या, सूर्या अन् तिलक वर्मासाठी आजचा Qualifier 2 मॅच खूपच महत्वाचा! कशामुळे? वाचा

IPL 2025 MI VS PBKS Qualifier 2 match : आयपीएल 2025 चा हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे, आज दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात खेळला जाईल.

क्वालिफायर 1 मध्ये पंजाबला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला होता, परंतु अंतिम फेरीत पोहोचण्याची ही त्यांची दुसरी संधी आहे, जर ही संधी त्यांनी गमावली तर पुर्ण संघाला घरचा रस्ता धरावा लागेल तर दुसरीकडे मुंबई फायनलमध्ये जाईल. हेच मुंबईच्या बाबतीतही घडू शकते.

MI VS PBKS Qualifier 2 match

पंजाब आणि मुंबईचा सामना कोण जिंकेल हे आताच सांगता येत नाही पण मुंबईचे तीन खेळाडू अनुक्रमे श्रेयस अय्यर, हार्दीक पांड्या, सूर्या अन् तिलक वर्मासाठी आणि पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर या चौघांसाठी आजचा Qualifier 2 मॅच खूपच महत्वाचा आहे, याचे प्रमुख कारणही आहे तेच आपण आता या खेळाडूंच्या कामगिरीनुसार जाणून घेऊया.

1. हार्दिक पांड्या विक्रमाच्या उंबरठ्यावर..

हार्दीक पांड्या मुंबईकडून आज जोरदार कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. आयपीएल करीअरमध्ये त्याने आतापर्यंत 148 षटकार ठोकले आहे, आज जर तो आणखी दोन षटकार मारण्यात यशस्वी झाला तर त्याचे आज दीडशे षटकार पुर्ण होतील. आतापर्यंत त्याने आपल्या T20 करियरमध्ये 298 षटकार लगावले आहेत.

2. तिलक वर्मा फक्त 45 धावा दूर..

मुंबईचा आणखी एक खेळाडू तिलक वर्मा मधल्या फळीची कमान यशस्वीरित्या सांभाळत आहे. त्याने आतापर्यंत 12 डावात 299 धावा केल्या आहेत, यासह आयपीएल करीअरमध्ये त्याला 1500 धावा पुर्ण करण्यासाठी 45 धावांची गरज आहे. सांगायचे झाले तर त्याने आतापर्यंत 53 सामन्यात 1, 455 धावा केल्या आहेत.

3. सूर्यकुमार यादवला हवेत आणखी 6 षटकार!

सूर्यकुमार यादव या सीजनमध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. त्याने त्याच्या फलंदाजीने मुंबईला सामने जिंकून दिले आहेत. आता तो लवकरच आणखी धावा काढुन या आयपीएल करीअरमध्ये सर्वात जास्त धावा करण्याच्या विक्रमापर्यंत पोहचू शकतो. सूर्याने या हंगामातील आयपीएलमध्ये 15 सामन्यात 67.30 च्या सरासरीने 167.83 च्या स्ट्राइक रेटनुसार, 673 रन बनवल्या आहेत. सूर्यकुमार यादवला T20 क्रिकेट (IPL + CLT20) मध्ये 150 षटकार पुर्ण करण्यासाठी फक्त 5 सिक्सरची गरज आहे. त्याचे आतापर्यंत 145 सिक्सर झाले असून 401 चौकार त्याने लगावले आहे.

4. श्रेयस अय्यर फक्त 10 रन दूर..

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर या सीजनमध्ये खूपच जोमात आहे, त्याने जवळपास 15 डावात 516 धावा केल्या आहेत, आता 6,500 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त 10 धावांची गरज आहे. आतापर्यंत श्रेयस अय्यरने 238 सामन्यात 6,490 रन बनवले. आज त्याने दहा धावा काढल्यास तो मैलाचा दगड पार करेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+