KKR Vs RCB : पावसामुळे ईडन गार्डन्सवर IPL २०२५ चा सलामीचा सामना धोक्यात? कसा आहे हवामानचा अंदाज?
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल- २०२५ ला शनिवारी २२ मार्च रोजी सुरुवात होईल. पहिलाच सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) यांच्यात खेळवला जाईल. हा रोमहर्षक सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. चाहते या सामन्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. परंतु पावसामुळे या सामन्यातील मजा गायब होऊ शकते, असाही अंदाज बांधला जात आहे.

कसा आहे पावसाचा अंदाज?
कोलकातामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. येथे उद्या म्हणजेच शनिवारीही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येथे सकाळी ढगाळ वातावरण असेल. भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास येथे पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामन्यादरम्यानही पावसाची शक्यता जास्त असली तरी, अॅक्युवेदरच्या मते परिस्थितीत थोडी सुधारणा झाली आहे.
किती टक्के आहे पावसाची शक्यता?
सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता सुमारे ४०% आहे. केकेआर आणि आरसीबी यांच्यात एक छोटासा सामना खेळवला जाईल आणि ईडन गार्डन्सच्या ड्रेनेज सिस्टीमची देखील चाचणी केली जाईल. त्याच वेळी संध्याकाळी बॉलिवूड स्टार्सचा एक चमकदार उद्घाटन समारंभ देखील नियोजित करण्यात आला आहे. स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी पाऊस पडला तर तो विस्कळीत होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.
चाहते नाराज होणार?
उद्धाटनाच्या सामन्यांत पाऊस येऊ नये, अशी अपेक्षा चाहते आणि कार्यक्रम आयोजक व्यक्त करत आहेत. सामन्याच्या दिवशी पाऊस थांबेल आणि कोलकात्यात हवामान स्वच्छ होईल, अशी प्रार्थना चाहत्यांकडून केली जात आहे. हवामानाच्या अंदाजानुसार रविवार (२३ मार्च) पर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची आणि कोलकात्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. केकेआर आयपीएलचा गतविजेता आहे. यावेळी अजिंक्य रहाणे केकेआरचे नेतृत्व करेल. आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे. दोन्ही संघ त्यांच्या आयपीएल मोहिमेची सुरुवात चांगल्या पद्धतीने करण्यास उत्सुक असतील.












Click it and Unblock the Notifications