T20 World Cup: जय शाह यांचं भाकीत ठरलं खरं; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून टी- 20 विश्वचषक 2024चे विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी- 20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे.भारतीय संघाने 13 वर्षांची प्रतिक्षा अखेर संपवली आहे. टी- 20 विश्वचषक ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
भारताने 2007 नंतर आता दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. भारतीय संघाने एकही सामना न गमावता टी- 20 विश्वचषकाचे जेतेपद आपल्या नावे केले आहे.

काय म्हणाले होते जय शाह?
यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जय शाह म्हणतात की, " आपण वन - डे विश्वचषक गमावला असला तरी आपण आगामी काळात बार्बाडोस येथे होणारा T20 विश्वचषक नक्की जिंकू." यावेळी त्यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचं म्हटलं होते. हा व्हिडिओ क्रिकेटशी संबंधित एका कार्यक्रमातील असल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे टीम इंडियावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती द्रौपदी मूर्म, मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.
Man of his words ❤️ #T20WorldCup2024 #JayShah pic.twitter.com/KPINei64Es
— Indresh kumar 🇮🇳 (@The_IndreshGaur) June 30, 2024
खरतर भारताने शेवटचा टी - 20 विश्वचषक 2007 साली पाकिस्तान विरोधात जिंकला होता. त्यानंतर आता 2024 म्हणजेच जवळपास 17 वर्षानंतर भारताला T20 चषक जिंकता आला आहे.
या मोलाच्या विजयामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे अशा फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. तर बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल यांच्या गोलंदाजीचीही अमिट छाप उमटली आहे. पण अंतिम सामन्याच्या 'अंतिम' पाच षटकांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे खऱ्या अर्थानं दक्षिण आफ्रिकेच्या हातून सामना आणि पर्यायाने विश्वचषकही निसटला!
यामध्ये जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांनी केलेली भेदक गोलंदाजी महत्वाची होती. विशेष म्हणजे हार्दिक याने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या क्लासन याला माघारी धाडत महत्वाची भूमिका पार पाडली.
हा ठरला टर्निंग पॉइंट
सूर्यकुमार यादवचा अविश्वसनीय झेल! हेच कारण ठरलं भारताच्या विजयाचा. घातक फलंदाज मिलर याचा सूर्यकुमारने सीमारेषेवर झेल घेतला. आणि सामना फिरला. सीमारेषेवर सूर्यकुमार यादव जिवाच्या आकांताने झेल पकडण्यासाठी पळत होता.
अगदी सीमारेषेला जवळपास खेटेपर्यंत पोहोचला तेव्हा दोन्ही हात पुढे करून एक अविश्वसनीय झेल सूर्यकुमार यादवनं टिपला. आणि अखेरीस भारताने 2024 च्या टी - 20 विश्व चषकावर आपलं नाव कोरले.












Click it and Unblock the Notifications