शरीर साथ देईना! रोहित-विराटनंतर जसप्रीत बुमराहही घेणार क्रिकेटमधून निवृत्ती?, एका विधानाने खळबळ!
Jasprit Bumrah : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज आणि जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्याबद्दल खूप उत्साही आहे. त्याला इंग्लंडमध्ये ड्यूक्स बॉलने गोलंदाजी करायला आवडते आणि तिथल्या परिस्थितीत तो पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले. परंतु, त्याच्या एका विधानाने क्रिकेट विश्वात पुन्हा खळबळ उडाली आहे. त्याच्या या विधानावर स्पष्ट होते की, तो विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. जसप्रीत बुमराह नेमकं काय म्हणाला, त्याविषयी जाणून घेऊया.
बुमराहने 'बियाँड२३' युट्यूब चॅनलवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कसोबत झालेल्या संवादात बऱ्याच मनातील गोष्टी शेअर केल्या.

जसप्रीत बुमराह म्हणाला की, 'इंग्लंडमध्ये खेळणे नेहमीच वेगळ्या प्रकारचे आव्हान असते. मला ड्यूक्स बॉलने गोलंदाजी करायला आवडते. जरी, आता चेंडूमध्ये काही बदल झाले आहेत, परंतु तिथली खेळपट्टी, हवामान आणि स्विंग यामुळे चेंडू मजेदार बनतो. जेव्हा चेंडू मऊ होतो, तेव्हा खरे आव्हान सुरू होते, असाही तो म्हणाला.
बुमराह पुढे बोलताना म्हणाला की, त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचे आहे, परंतु आता तो सामने मोठ्या शिताफीने आणि हुशारीने निवडेल. जेणेकरून त्याच्या शरीराला विश्रांती मिळंण गरजेचे आहे.
बुमराह म्हणाला की, सर्व फॉरमॅटमध्ये सतत खेळणे सोपे नाही. मी हे बऱ्याच काळापासून करत आहे, पण आता शरीराच्या गरजा समजून घेऊन स्पर्धा निवडणे महत्त्वाचे वाटू लागले आहे, एव्हाना ते गरजेचे देखील आहे.
टारगेटच्या मागे लागण्याची गरज वाटत नाही
जसप्रीत बुमराह पुढे मुलाखतीत बोलताना म्हणाला की, तो आता आकडेवारी किंवा लक्ष्यांमागे धावत नाही तर त्याला क्रिकेट आवडते. मी जेव्हा जेव्हा ध्येये ठेवली आहेत, तेव्हा मी ती साध्य करू शकलो नाही. आता मी फक्त एक दिवस जगतो आणि आठवणी गोळा करतो, कारण माझ्या कारकिर्दीनंतर या आठवणी माझ्यासोबत राहणार आहे.
बुमराह इंग्लंड दौऱ्यावर तिसऱ्यांदा चालला
बुमराहचा इंग्लंडमधील हा तिसरा द्विपक्षीय कसोटी मालिका दौरा असेल. याआधी तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत गेला. तसेच दोनदा इंग्लंडचा दौरा केला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध ८ कसोटी सामन्यात २३.७८ च्या प्रभावी सरासरीने ३७ विकेट्स घेतलेल्या आहेत.
बुमराह सोबत या गोलंदाजांचाही समावेश
यावेळी, इंग्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त, टीम इंडियाकडे मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप सारखे वेगवान गोलंदाज आहेत. इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजी शैलीविरुद्ध, भारताची वेगवान गोलंदाजी कोणत्याही दिवशी विरोधी संघावर हल्ला करू शकते, असेही त्याने स्पष्ट केले.
...तेव्हा फलंदाजांना बाद करण्याची संधी
बुमराह म्हणाला, 'ते (इंग्लंड) ज्या आक्रमक शैलीत खेळतात ती थोडी वेगळी आहे आणि मला ते पूर्णपणे समजत नाही, पण जेव्हा फलंदाज असे खेळतात तेव्हा आपल्याला त्यांना लवकर बाद करण्याची संधी देखील असते.'
भारत इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका कधी?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जून ते ३१ जुलै दरम्यान लीड्स, बर्मिंगहॅम, लॉर्ड्स, मँचेस्टर आणि ओव्हल अशा ठिकाणी खेळवली जाईल. तथापि, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी त्याच्या तंदुरुस्ती आणि कामाच्या ताणाकडे विशेष लक्ष दिले जाईल असे संकेत दिल्याने बुमराह सर्व कसोटी सामने खेळू शकणार नाही.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications