जसप्रीत बुमराहने 'दुहेरी शतक' झळकावून केला विश्वविक्रम, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या चौथ्या सामन्यात जसप्रीत बुमराहने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 200 बळी पूर्ण केले आहेत. भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये ही कामगिरी करणारा तो सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडला बाद करून बुमराहने हा विक्रम केला आहे.
जसप्रीत बुमराहने 200 विकेट पूर्ण केल्या
जसप्रीत बुमराह आता भारतासाठी 200 बळी घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. या चमकदार कामगिरीने त्याने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे. यापूर्वी, भारतीय क्रिकेटचे दिग्गज कपिल देव यांनी 1983 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या 50 व्या कसोटी सामन्यात 200 बळी पूर्ण केले होते. त्यावेळी त्यावेळी कपिल देव सर्वात वेगवान 200 बळी घेणारे भारतीय गोलंदाज होते.

जसप्रीत बुमराहने कपिल देवचा विक्रम मोडला
जसप्रीत बुमराहने कपिल देवचा विक्रम तोडत केवळ 44 कसोटी सामन्यांमध्ये 200 बळी पूर्ण केले आहेत. बुमराहा भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान 200 बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. हा टप्पा गाठून बुमराहने क्रिकेट विश्वात आपले नाव आणखीनच मोठे केले आहे. त्याचवेळी पाकिस्तानच्या यासिर शाहने 33 कसोटी सामन्यांमध्ये सर्वात जलद 200 बळी घेण्याचा विक्रम पूर्ण केला होता, जो आतापर्यंतचा सर्वात जलद विक्रम आहे.
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठी कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 20 पेक्षा कमी सरासरीने 200 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. हा एक मोठा विक्रम आहे. कारण गोलंदाजांसाठी कसोटी क्रिकेटमध्ये 20 पेक्षा कमी सरासरी करणे खूप कठीण आहे. हा विक्रम बुमराहच्या गोलंदाजीची गुणवत्ता आणि सातत्य दर्शवते. त्याची कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची बाब आहे. म्हणूनच जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं.
कसोटीत सर्वात जलद 200 विकेट घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज
जसप्रीत बुमराह- 44 कसोटी सामने
कपिल देव- 50 कसोटी सामने
जवागल श्रीनाथ- 54 कसोटी सामने
मोहम्मद शमी- 55 कसोटी सामने












Click it and Unblock the Notifications