'धोनीसाठी हुक्का तयार करून देईल त्यालाच संघात संधी'; कॅप्टन कूलवर करिअरमधील सर्वात गंभीर आरोप

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने एक धक्कादायक आणि गंभीर आरोप करत क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर काही निवडक खेळाडूंनाच मदत करण्याचा आणि पाठिंबा देण्याचा आरोप केला आहे. एका डिजिटल वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या या सनसनाटी दाव्यामुळे बीसीसीआय (BCCI) आणि धोनी यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

irfan pathan serious allegation ms dhoni hookah claim

आधी कौतुक, नंतर मोठा आरोप

मुलाखतीत इरफान पठाणने जुन्या आठवणींना उजाळा दिला. २००४ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आठवण सांगताना तो म्हणाला, "त्या वेळी मी गोलंदाजीमध्ये फारशी चांगली कामगिरी करत नव्हतो. त्यावेळी धोनीने मला सकारात्मक राहण्याचा आणि जास्त चिंता न करण्याचा सल्ला दिला होता. 'माध्यमांमध्ये तुझ्याविषयी काय छापून येते याकडे दुर्लक्ष करून फक्त तुझ्या खेळावर लक्ष केंद्रित कर,' असा सल्ला त्याने दिला होता."

मात्र, ही आठवण सांगितल्यानंतर लगेचच पठाणने धोनीवर अत्यंत गंभीर आरोप केला. तो म्हणाला, "धोनी काही निवडक खेळाडूंनाच पाठिंबा द्यायचा. जे खेळाडू त्याच्यासाठी हुक्का भरत होते, त्यांनाच संघात अधिक संधी मिळत होती." पठाणने कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही, पण त्याच्या या स्फोटक विधानामुळे मोठे वादळ निर्माण झाले आहे. जे खेळाडू धोनीची मर्जी राखत नव्हते, त्यांना संधी मिळत नसे, असाही दावा पठाणने केला आहे.

पठाणच्या दाव्यामुळे क्रिकेट वर्तुळात दोन गट

आजवर धोनी आणि पठाण यांच्यात कोणताही वाद असल्याचे समोर आले नव्हते. त्यामुळे पठाणने हे विधान गंमतीने केले आहे की खऱ्या अर्थाने धोनीवर आरोप केला आहे, यावरून क्रिकेट विश्वात दोन गट पडले आहेत. काहीजण पठाणच्या या विधानाला प्रसिद्धी मिळवण्याचा एक मार्ग मानत आहेत, तर काहीजण धोनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

पठाणने यापूर्वीही एका मुलाखतीत, धोनीच्या नेतृत्वाखालील संघातून अचानक बाहेर काढल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी त्याने म्हटले होते की, धोनीने त्याला संधी का दिली नाही, याबद्दल त्याला कधीही योग्य स्पष्टीकरण मिळाले नाही. त्यामुळे त्याचे आताचे विधान त्या जुन्या नाराजीचाच भाग असल्याचे मानले जात आहे.

बीसीसीआय आणि धोनीची प्रतिक्रिया अपेक्षित

इरफान पठाणचा हा आरोप अत्यंत गंभीर असल्यामुळे बीसीसीआय आणि खुद्द महेंद्रसिंग धोनी यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. धोनीने आजपर्यंत कोणत्याही वादावर थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. मात्र, त्याच्यावर करण्यात आलेल्या या वैयक्तिक आरोपांमुळे तो मौन तोडणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. भारतीय क्रिकेट संघात खेळाडूंची निवड गुणवत्तेवर होते की चमचेगिरीवर, याबद्दल या वादामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची पुढील वाटचाल भारतीय क्रिकेटच्या निवड प्रक्रियेवर मोठा परिणाम करू शकते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+