15 वर्षांची साथ..! मुंबई बंगळुरू सामन्याआधी विराट कोहलीचा रोहीत शर्माबद्दल मोठा खुलासा! व्हिडिओ जारी
Ipl 2025 virat kohli Spoke openly about his relationship with rohit sharma : आयपीएलचा सीजन सुरु असून मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर बंगळूरू हे दोन संघ आयपीएल ट्राॅफीचे दावेदार आहेत. भारतीय संघात एकत्र खेळणारे विराट कोहली आणि रोहीत शर्मा हे धुरंधर फलंदाज आता आयपीएलमध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत, अशा स्थितीत विराट कोहलीने रोहीत शर्माबद्दल एक वक्तव्य केले असून त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या वक्तव्याची आता खूप चर्चा होत आहे..
रोहीत शर्मासोबतच्या बाँडसंदर्भात दिलखुलास उत्तर दिले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील संबंध क्रिकेट जगतात नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. दोघांमध्ये मतभेद असल्याच्या अनेक अफवा पसरल्या आहेत, परंतु दोघांनीही या अफवांचे खंडन केले आहे आणि एकमेकांच्या क्रिकेट क्षमतेचा नेहमीच आदर केला आहे आणि मजबूत व्यावसायिक संबंध राखले आहेत.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील सामन्याआधी विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे. विराट कोहलीने रोहित शर्मासोबतच्या त्याच्या नातेसंबंधावर व्यक्त झाला आहे. त्यांनी क्रिकेटमधील आपल्या एकत्र केलेल्या प्रवासाचा उल्लेख केला आहे.
𝐓𝐡𝐞 𝐑𝐎-𝐊𝐎 𝐛𝐨𝐧𝐝! 🫂
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 6, 2025
Virat Kohli talks about his equation with Rohit Sharma, and how they’ve bonded over the years and created some wonderful memories! ✨
We’re just a day away from seeing them go up against each other, and we wish them well! 😌👊#PlayBold #ನಮ್ಮRCB… pic.twitter.com/I6GHFHxgEx
रोहित शर्मासोबतच्या नातेसंबंधावर विराट कोहलीचे विधान
RCB चॅनलवर रोहीत शर्मासोबतच्या नात्याबद्दल बोलताना कोहली म्हणाला, 'एवढा वेळ एखाद्यासोबत खेळल्याने नैसर्गिकरित्या एक मजबूत नाते निर्माण होते, खासकरून जेव्हा तुम्ही एकमेकांकडून क्रिकेटबद्दल खूप काही शिकता. सुरुवातीच्या दिवसात आम्ही एकमेकांकडून सतत काहीतरी शिकत होतो आणि आमच्या करिअरमध्ये एकत्र वाढत होतो. आम्ही नेहमी विचारांची देवाणघेवाण करत होतो, प्रश्न विचारत होतो आणि खेळाच्या विविध पैलूंवर चर्चा करत होतो.
कोहली आणि रोहीत शर्मामध्ये मतभेद होते का?
कोहली म्हणाला, 'कालांतराने, आम्ही नेतृत्वाच्या भूमिकेतही एकत्र काम केले, जिथे आम्ही नियमितपणे रणनीती आणि कल्पनांवर चर्चा करायचो. एखाद्या विशिष्ट परिस्थितीसाठी किंवा सामन्यासाठी सर्वोत्तम दृष्टीकोन कोणता असू शकतो यावर अनेकदा आम्हा दोघांची मते समान होती. आपण एकमेकांवर विसंबून राहू शकतो हे जाणून आपल्या दोघांमध्ये असलेला विश्वास अमूल्य आहे.
15 वर्षे भारतासाठी खेळू हे कधीच निश्चित नव्हते
विराट पुढे म्हणाला, 'आमच्या दीर्घ कारकिर्दीचा विचार करता आम्हा दोघांनाही या प्रवासाचा अभिमान वाटतो. आम्ही दोघे 15 वर्षे भारतासाठी खेळू हे कधीच निश्चित नव्हते, परंतु आम्ही एकत्र निर्माण केलेले सातत्य आणि आठवणी आश्चर्यकारकपणे समाधानकारक आहेत.
आयपीएल 2025 मधील आतापर्यंतचा प्रवास मुंबई इंडियन्ससाठी (MI) काही खास राहिलेला नाही. आतापर्यंत त्यांनी पहिल्या चार सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. पुढील सामन्यात ते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या दुसऱ्या विजयाकडे लक्ष देतील. दुसरीकडे, आरसीबीने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि वानखेडे स्टेडियमवर एमआयला पराभूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या सामन्यात केवळ संघांमध्येच टक्कर होणार नाही, तर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गज क्रिकेटपटूंमध्येही संघर्ष होणार आहे.












Click it and Unblock the Notifications