Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विराट कोहली पुढे, चाहता मागे; जयपूरच्या मैदानावर रंगला पळापळीचा थरार, नेमके काय झाले? पहा व्हिडीओ

सध्या भारतातील वेगवेगळ्या शहरांत आयपीएलचे सामने सुरु आहेत. रविवारी जयपूर येथील एसएमएस क्रिकेट मैदानावर राजस्थान राॅयल्स विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या. एक, दोन नाही तर तीन चाहत्यांनी स्टार फलंदाज विराट कोहलीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. चाहता अंगावर येत असल्याचे पाहून विराट कोहलीही पळायला लागला. अर्थात त्यावेळी लगेच सुरक्षारक्षक धावले व त्यांनी चाहत्याला पकडले. विराट व चाहत्याचा हाच एकमेकांमागे पळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Virat Kohli viral video

नेमके काय झाले होते?

रविवारी सवाई मानसिंग स्टेडिअमवर राजस्थान राॅयल्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर बेंगलुरु यांच्यात सामना रंगला. त्यात आरसीबीने राजस्थानचा ९ विकेटने पराभव केला. त्यानंतर सेसेमनी सुरु असताना विराट कोहली राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विक्रम राठोड यांच्याशी बोलत होता. तेव्हा एका चाहत्याने सर्व सुरक्षा व्यवस्था तोडून मैदानात प्रवेश केला. चाहत्याला त्याच्याकडे येताना पाहून कोहली धावू लागला. कोहलीला भेटण्यासाठी चाहता मैदानात घुसला. विराटला पळून जाण्यास त्या चाहत्याने भाग पाडले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या चाहत्याला पकडले.

व्हिडीओ व्हायरल

चाहता आपल्याकडेच येत आहे, हे विराट कोहलीने ओळखले. या चाहत्याला कोहलीला मिठी मारायची होती. मात्र तो जवळ येण्यापूर्वीच विराट कोहलीही पळू लागला. चाहता त्याच्या मागे पळत असतानाच सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले. त्यामुळे विराट कोहली वाटला, अन्यथा या चाहत्याने त्याला मिठीच मारली असती. हा व्हिडीओ मात्र सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

आरसीबी टाॅप-४ मध्ये

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा सहाव्या सामन्यातील चौथा विजय आहे. या विजयासह, संघाने आयपीएल २०२५ पॉइंट्स टेबलमध्ये पुन्हा टॉप-४ मध्ये स्थान मिळवले आहे. आरसीबी आता ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानवर बेंगळुरूच्या शानदार विजयात विराट कोहली पुन्हा एकदा चमकला. १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने ४५ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी केली. पहिल्या विकेटसाठी विराट कोहली आणि फिलिप सॉल्ट यांनी ९२ धावांची भागीदारी केली. साल्टने ३३ चेंडूत ६५ धावा करत आरसीबीच्या विजयाचा पाया रचला. साल्ट आणि कोहली व्यतिरिक्त, देवदत्त पडिकलने २८ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. यापूर्वी, यशस्वी जयस्वालने राजस्थान रॉयल्सला या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या डावखुऱ्या सलामीवीराने ७५ धावांची शानदार खेळी केली होती, परंतु आरसीबीच्या फलंदाजांनी त्याची खेळी उद्ध्वस्त केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+