विराट कोहलीच्या पाठीशी आहे 'बजरंगबली हनुमान'? त्यामुळेच पाडतोय धावांचा पाऊस, का होताहेत चर्चा? वाचा
आयपीएल-२०२५ च्या मॅचमध्ये विराट कोहली सध्या चांगलाच फार्ममध्ये दिसत आहे. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेतही तो साई सुदर्शननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आत्तापर्यंत ९ सामन्यांत ६५ च्या सरासरीने ३९२ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट १४४ असा जबरदस्त राहीला आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या सातत्यपूर्ण कामगिरीची चर्चा सुरु झाली आहे. आता तो एवढा जबरदस्त फार्ममध्ये कसा आलाय? तर त्याचे उत्तर सांगितले जातेय भगवान बजरंगबली... होय. विराटसोबत हनुमान कामम असतात, असे बोलले जातेय. ते का? ते आपण पाहूयात...

विराट कोहलीच्या बॅगची चर्चा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची त्यांच्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मॅच होती. या मॅचमध्ये सामना खेळण्यासाठी विराट कोहली आपल्या टीमसह विमानतळावर पोहोचला. सगळे खेळाडू गुलाबी रंगाच्या टी शर्टवर दिसले. या सगळ्या खेळाडूंचे फोटो फोटोग्राफर्सनी काढले. त्यात विराटचा फोटीही होताच. मात्र त्याच फोटोनंतर विराट कोहलीच्या सातत्यपूर्ण कामगिरीची चर्चा सुरु झाली.
काय होतं बॅगवर?
गुलाबी रंगाच्या टी-शर्टवर विराट कोहलीचा फोटो जेव्हा काढला तेव्हा त्याच्या बॅगला एक किचन दिसले. अर्थात ते किचन होते बजरंगबली हनुमानाचे. विराट कोहलीची ही बँग व हे किचन यापूर्वीही अनेकदा दिसले आहे. विराट कोहली बजरंबली हनुमानाचा भक्त आहे, आणि तेच विराट कोहलीच्या पाठीमागे असतात, असं त्यांचे चाहते बोलू लागले. यापूर्वीही विराट कोहलीसोबत जेव्हा-जेव्हा ही बँग दिसलीय तेव्हा-तेव्हा त्याने एकतर फिफ्टी मारली नाहीतर शतक केलंय, असेही दावे करण्यात आले आहेत.
आयपीएलमध्ये कोहलीची धूम
आयपीएल- २०२५ मध्ये विराट कोहलीची बॅट सध्या जोरात बोलताना दिसत आहे. आत्तापर्यंत त्याने ९ सामन्यांमध्ये ६५ च्या सरासरीने आणि १४४ च्या स्ट्राईक रेटने ३९२ धावा चोपल्या आहेत. त्याने ५ अर्धशतकेही झळकावली आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो साईसुदर्शननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात विराट कोहलीने कृष्णनगरी वृंदावनला भेट देऊन प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले होते. यानंतर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले. जानेवारी २०२३ च्या सुरुवातीला कोहलीने प्रेमानंद महाराजांना भेट दिली होती. त्यानंतर १६० धावांची खेळी खेळली होती. याशिवाय विराट कोहली नीम करोली बाबांचाही भक्त आहे.
आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचेल का?
आरसीबीने या हंगामात ९ सामने खेळले आहेत. त्यापैकी आरसीबीने तीन सामने गमावून ६ सामने जिंकले आहेत. आता त्यांना प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी फक्त २ विजयांची आवश्यकता आहे. सध्या त्याचे ५ सामने शिल्लक आहेत. विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता, या संघाला पुढील फेरीत पोहोचणे कठीण वाटत नाही.












Click it and Unblock the Notifications