Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी 14 वर्षांचा नव्हे! त्याचं वयं एवढं.. 'हा' दावा आला समोर खरं काय?
IPL 2025 Vaibhav Suryavanshi's age controversy : वैभव सूर्यवंशी अवघ्या 14 वर्षाचा हा बिहारचा खेळाडू आयपीएलमधील सर्वात कमी वयाचा खेळाडू असल्यानेच जास्त चर्चेत आला आहे. या खेळाडूने आपल्या नेत्रदीपक खेळीने आयपीलमध्ये चार चाँद लावले. भारतातर्फे सर्वात जलद शतक करुन तो आता चर्चेत आहे.
या खेळाडूचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे पण अलिकडे त्याच्या वयाबद्दल वाद निर्माण झाला आहे. त्याचे वय 14 नसून 16 वर्ष आहे असा दावा आता केला जात आहे.

वैभवने किती सांगितले होते आपले वय?
बिहारच्या समस्तूपर जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या वैभवचे गाव ताजपूर हे आहे. येथेच वैभव लहानचा मोठा झाला. त्याने आपल्या 2023 साली झालेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यावेळी त्याने त्याचा वाढदिवस सप्टेंबरमध्ये असल्याचे सांगितले होते. या मुलाखतीत त्यांनी असेही सांगितले की ते सप्टेंबरमध्ये तो 14 वर्षांचा होईल. परंतु कागदपत्रांमध्ये त्यांची जन्मतारीख 27 मार्च 2011 अशी नमूद आहे.
सोशल मीडियावर होतोय व्हिडिओ व्हायरल..
आता, सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन व्यक्ती दिसत आहेत. हे दोन्ही व्यक्ती स्वतःला वैभव सूर्यवंशीच्या गावातील असल्याचा दावा करतात आणि वैभवचे खरे वय 16 वर्षे असल्याचेही सांगत आहेत.
दावा करणारे काय म्हणतात व्हिडिओत?
दावा करणाऱ्यांपैकी एक व्यक्ती म्हणतो.. "आम्ही समस्तीपूर येथील राहणारे आहोत. वैभव सूर्यवंशीचे आणि आमचे एकच गाव आहे. वैभव सूर्यवंशी आमच्यासोबत खेळायचा.आम्ही वैभवला नेटमध्यो गोलंदाजी केली आहे. आम्हाला गर्व आहे की, बिहारचा मुलगा क्रिकेटमध्ये चमकत आहे पण वाईट या गोष्टीचे वाटते की, वैभवचे जे वय 14 सांगितले जात आहे पण त्याचे खरे वय 16 वर्ष आहे." आता या व्हायरर व्हिडिओमुळे वैभवच्या वयावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
वैभवच्या नावावर काय आहे विक्रम?
वैभव सूर्यवंशी या अवघ्या चौदा वर्षीय खेळाडूने आज 19 एप्रिल रोजी 2025 राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळवली आहे. IPL मध्ये खेळणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात आणि सर्वात जलद ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने 35 चेंडूत 101 धावा काढत शतक झळकावले आहे.
वैभवचे पदार्पण कोणत्या संघाविरुद्ध
वैभवने लखनऊ संघाविरुद्ध पदार्पण केले आहे, पहिल्या सामन्यातच 20 अवघ्या चेंडूत 34 धावा त्याने केल्या आणि संघासाठी योगदान दिले. बहारदार फलंदाजी पहिल्या सामन्यात करुन त्याने सर्वांचे लक्षही वेधले होते.












Click it and Unblock the Notifications