Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वैभव सूर्यवंशीला किती भाऊ आहेत, वडील काय करतात,'भावाने' दिल्या जून्या आठवणींना उजाळा

Vaibhav Suryavanshi Struggle: आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील प्रचंड कष्ट करतात. आपल्या मुलाला कोणतेही गोष्टीची कमी पडून नये म्हणून दिवसरात्र राबतात. वैभव सूर्यवंशीच्या बाबतीतही असेच घडले आहे, त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी आपल्या मुलाला क्रिकेटर बनताना पाहण्याचे स्वप्न पाहिले होते. वन इंडिया हिंदीशी केलेल्या खास बातचीतमध्ये वैभवचे नातेवाईक चंद्रदीप कुमार यांनी त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगितली आहे.

बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतकरी असूनही संजीव यांना त्याचा मुलगा वैभवला किक्रेटमध्ये पुढे जाताना पहायचे होते. त्याच्या गावी योग्य प्रशिक्षण सुविधा आणि प्रशिक्षणाचा अभाव असल्याने ते वैभवच्या यशासाठी काहीही करण्यास तयार होते.

vaibhav suryavanshi

चंद्रदीप कुमार यांनी सांगितले की, वैभव सूर्यवंशीला 3 भाऊ आहेत. मोठ्या भावाचे नाव उज्ज्वल सूर्यवंशी, दुसरा वैभव सूर्यवंशी आणि तिसरे आशीर्वाद सूर्यवंशी. काका (संजीव सूर्यवंशी) यांना त्यांनी पाहिलेले स्वप्न वैभवकडून त्यांची स्वप्ने पूर्ण करायची होती. म्हणूनच, त्यांनी वैभवच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी आपले जीवन समर्पित केले.

शेतीसोबतच त्यांच एक छोटेसे दागिन्यांचे दुकानही चालवत असे, पण नंतर वैभवच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी दुकानात काम करणे थांबवले. यानंतर वैभवचा मोठा भाऊ उज्ज्वल सूर्यवंशी याने दुकानाची जबाबदारी घेतली आणि आता काका घरी राहतात. वैभव लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्यात पारंगत झाला. वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्याला फक्त 10 वर्षांचा असताना क्रिकेट प्रशिक्षणासाठी पटनाला पाठवण्याचा निर्णय घेतला.

प्रशिक्षण केंद्र गावापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर होते. आर्थिक अडचणीमुळे वैभवच्या वडीलांनी आपली जमीन विकली त्यांनी आपल्या मुलाचे भविष्य घडवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. मुलांच्या प्रशिक्षणात कोणतेही कमतरता राहू नये म्हणून त्यांनी प्रचंड कष्ट घेतली आहेत.

वैभवचे क्रिकेटवरील समर्पण इतके होते की त्याने मोठ्या मुलांसोबत सराव करायला सुरुवात केली. खेळासाठी स्वतःला तयार करण्यासाठी नेट प्रॅक्टिसमध्ये दररोज 600 हून अधिक चेंडूंचा सामना करत असे. 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये वादळी शतक करुन क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली.

वैभवने 28 एप्रिल 2025 रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सकडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूंमध्ये शतक झळकावत तो T20 क्रिकेटमधील सर्वात कमी वयाचा शतकवीर ठरला. या शतकाने त्याने अनेक विक्रम मोडले आहेत. ज्यामध्ये सर्वात जलद भारतीय शतक (35 चेंडू) आणि सर्वात कमी वयात IPL शतक (14 वर्षे 32 दिवस) यांचा समावेश आहे. वैभवच्या या यशामागे त्याच्या वडिलांचा त्याग आणि कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+