IPl 2025 New Schedule: आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर, फायनल या दिवशी होणार, जाणून घ्या सर्व काही
IPL New Schedule 2025 : आयपीएल प्रेमींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. 17 मे पासून पुन्हा आयपीएल-2025 चा शंखनाद होणार आहे. लीग टप्प्यातील उर्वरित 13 सामने 6 ठिकाणी खेळवले जाणार आहेत.
प्लेऑफ स्टेज 29 मे पासून खेळवला जाईल आणि अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे. बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरुन ही माहिती शेअर केली. त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे 9 मे रोजी आयपीएल स्थगित करावे लागले. देश सध्या युद्धाच्या स्थितीत आहे असे सांगून बीसीसीआयने स्पर्धा पुढे ढकलली होती. अशा परिस्थितीत क्रिकेट स्पर्धा आयोजित करणे योग्य नाही, असा निर्णय घेत आयपीएल थांबविण्यात आले होते.
दरम्यान, दोन्ही देशामध्ये सीजफायरचा निर्णय झाल्यानंतर पुन्हा आयपीएल केव्हा सुरू होणार अशी चर्चा सुरु असतानाच बीसीसीआयने आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.
🗓️ #TATAIPL 2025 action is all set to resume on 17th May 🙌
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2025
The remaining League-Stage matches will be played across 6⃣ venues 🏟️
The highly anticipated Final will take place on 3rd June 🏆
Details 🔽https://t.co/MEaJlP40Um pic.twitter.com/c1Fb1ZSGr2
RCB Vs LSG सामन्याने होईल प्रारंभ
- बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील पहिला सामना 17 मे रोजी बेंगळुरूमध्ये खेळला जाईल.
- उर्वरित सामने जयपूर, दिल्ली, लखनौ, मुंबई आणि अहमदाबाद येथे खेळवले जातील. लीग स्टेज 27 मे रोजी संपेल.
- रविवार, 18 आणि 25 मे रोजी डबल हेडर सामने खेळले जातील. म्हणजेच 11 दिवसांत 13 लीग स्टेज सामने होतील.
- 8 मे रोजी धर्मशाळा येथे होणारा पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे थांबवावा लागला. हा सामना आता 24 मे रोजी जयपूर येथे खेळला जाईल.
- प्लेऑफ सामन्यांचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. यापूर्वी, हैदराबाद आणि कोलकाता येथे 2-3 प्लेऑफ सामने खेळवले जाणार होते.
किती सामने शिल्लक आहेत?
आयपीएल 2025 अंतर्गत 74 सामने खेळवले जाणार होते. 7 मे पर्यंत 57 सामने खेळले गेले होते, 8 मे रोजी 58 वा सामना मध्येच थांबवावा लागला.
म्हणजे आता 17 सामने शिल्लक आहेत. यापैकी 13 सामने लीग टप्प्यातील आहेत आणि 4 सामने प्लेऑफ टप्प्यातील आहेत.
बीसीसीआयने सशस्त्र दलांना केला सलाम
बीसीसीआयने देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला आणि दृढनिश्चयाला सलाम केला आहे. बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "भारताच्या सशस्त्र दलांच्या धाडस आणि समर्पणाला आम्ही सलाम करतो, ज्यामुळे क्रिकेटचे सुरक्षित पुनरागमन शक्य झाले आहे. बीसीसीआय राष्ट्रीय हिताला सर्वोच्च मानते आणि त्याच भावनेने आयपीएल यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
सर्व परदेशी खेळाडू भारतात आहेत का?
बीसीसीआयच्या माहितीनुसार, सर्व परदेशी खेळाडू भारतात नाहीत. जेव्हा बीसीसीआयने लीग स्थगित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा परदेशी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना त्यांच्या देशात परतण्यास सांगण्यात आले.
यातील बरेच खेळाडू त्यांच्या घरी परतले आहेत. त्याला पुन्हा बोलावले जाईल. तथापि, काही ऑस्ट्रेलियन खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल लक्षात घेऊन भारतात येण्यास नकार देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.












Click it and Unblock the Notifications