टीम इंडियातून ज्यांना बाहेर काढले गेले त्यांना रोहित शर्माने दिला धन्यवाद; जाणून घ्या त्यामागील कारण
IPL 2025 Rohit Sharma : भारतीय क्रिकेट चाहत्यांना कर्णधार रोहित शर्माची स्फोटक शैली पाहायला मिळाली ती 21 एप्रिल रोजी. ज्या दिवशी मुंबई इंडियन्सचा टीम मेंबर रोहितने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध त्याच्या परिचित शैलीत फलंदाजी केली.
रोहितने 45 चेंडूत 76 धावांची खेळी केली. या खेळीत 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. रोहितच्या प्रत्येक शॉटवर चाहते जल्लोष करत होते.
पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या व्यक्तीला बीसीसीआयने टीम इंडियामधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे, त्याच व्यक्तीची रोहितला फॉर्ममध्ये परत आणण्यात भूमिका आहे. हे स्वतः कर्णधार रोहित शर्माने मान्य केले व जाहीरपणे आभाप देखील व्यक्त केले.
रोहित शर्माने अभिषेक नायरला दिले श्रेय
चेन्नईविरुद्धच्या त्याच्या शानदार खेळीनंतर रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. त्याने त्याचा फोटो शेअर केला आणि लिहिले, रोहितने त्याच्या यशाचे श्रेय टीम इंडियाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना दिले आहे. गेल्या वर्षी जुलैपासून नायर टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफचा भाग होता, परंतु काही काळापूर्वी बीसीसीआयने त्याचा केंद्रीय करार रद्द केल्याची बातमी आली होती.

आयपीएलपूर्वी रोहितने अभिषेकसोबत सराव केला
टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यापूर्वीच अभिषेक नायर रोहित शर्माच्या जवळ होता. क्रिकबझमधील एका वृत्तानुसार, रोहित शर्मा बऱ्याच काळापासून नायरसोबत सराव करत आहे. आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वीच रोहित नायरसोबत होता. रोहितने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 26 धावांची खेळी खेळली, त्याच्या एक दिवस आधी तो अभिषेक नायरसोबत सराव करत होता. या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, रोहित शर्मा 2027 च्या विश्वचषकापर्यंत खेळू इच्छितो. पण यासाठी त्याने नायरची निवड केली आहे, जो त्याच्या फिटनेस आणि फलंदाजीवर काम करत आहे.
बीसीसीआयने दाखवला बाहेरचा मार्ग
अलिकडेच बीसीसीआयने नायरला गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधून मुक्त केले आहे. याशिवाय, बोर्डाने आणखी तीन जणांनाही काढून टाकले आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनर सोहम देसाई आणि स्टाफ अरुण कानडे यांनाही सहाय्यक स्टाफमधून काढून टाकण्यात आले आहे.
रोहितला 2027 चा वर्ल्डकप खेळायचा
क्रिकबझच्या मते, रोहित शर्मा २०२७ च्या विश्वचषकापर्यंत खेळत राहण्याची योजना आखत आहे आणि अभिषेक नायरसोबत त्याच्या फिटनेस आणि फलंदाजीवर काम करण्यासाठी तो जवळून काम करत आहे. तथापि, रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यातील भागीदारी आयपीएलच्या उर्वरित हंगामात कायम राहील की नाही याबद्दल अजूनही अटकळ आहे. यामागील कारण म्हणजे अभिषेक नायर एका प्रतिस्पर्धी फ्रँचायझीमध्ये सामील झाला आहे.












Click it and Unblock the Notifications