Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 : राजस्थान रॉयल्स मुद्दाम लखनऊकडून हरली! मॅच फिक्सिंगचे ढग; राहुल द्रविडच्या संघावर आरोप

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये 19 एप्रिल 2025 रोजी झालेला राजस्थान राॅयल्स संघ लखनऊ सूपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 2 धावांनी हरला. या सामन्यानंतर राहुल द्रविडच्या संघावर आरोप केला जात आहे. जिथे राजस्थान हा मॅच खिशात घालण्याच्या तयारी असताना अचानक पराभवाचे तोंड या संघाला पाहावे लागले.

या पराभवाने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या पराभवानंतर राजस्थान राॅयलच्या कामगिरीवर आणि हेतूवर शंका घेण्याचे प्रकारही घडले आहेत. यातच मॅच फिक्सिंगचा आता आरोपही होत आहे.

IPL 2025 Rajasthan Royals deliberately

राजस्थान राॅयल्सचा नूर पालटला

राजस्थान राॅयल्सचा संघ आयपीएलच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 2 धावांनी हरला. राजस्थान संघच हा सामना जिंकेल अशी पक्की खात्री सर्वच जण देत असताना सामन्याचा नूरच पालटला गेला.

राजस्थान राॅयल संघ मुद्दाम हरला का?

राजस्थान राॅयल्स संघाविरुद्ध 'मॅच फिक्सिंग'चा आरोप होत आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या तदर्थ समितीचे निमंत्रक जयदीप बिहाणी यांनी राजस्थान रॉयल्सवर हा आरोप केला आहे.

श्रीगंगानगरचे आमदार जयदीप बिहाणी यांनी न्यूज-18 राजस्थानशी बोलताना राजस्थान संघावर हल्ला चढवला आणि मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे. यामुळे राजस्थान राॅयल्सचा संघ सध्या संशयाच्या फेऱ्यात आहे.

काय आहे जयदीप बिहाणी यांचा आरोप?

जयदीप बिहाणी यांनी आरोप केला की, राजस्थानविरुद्धच्या सामन्याच्या शेवटच्या षटक राजस्थानच्या पराभवाचे कारण ठरले आहे. या शेवटच्या षटकावर जयदीप बिहाणींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राजस्थान रॉयल्सला शेवटच्या षटकात विजयासाठी 9 धावांची गरज होती. ध्रुव जुरेल स्ट्राइकवर होता, तर शिमरॉन हेटमायर नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी होता. गोलंदाज आवेश खानने या षटकात फक्त 6 धावा दिल्या आणि त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सने सामना 2 धावांनी जिंकला. यात त्यांना शंका वाटत आहे.

राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेट प्रकरणांविरोधात आवाज उठवत आहेत

जयदीप बिहानी गेल्या काही काळापासून राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेट प्रकरणांविरोधात आवाज उठवत आहे. यापूर्वी, त्याने आयपीएल प्रकरणांपासून राज्य संघटनेच्या तदर्थ समिती आणि क्रीडा परिषदेला दूर ठेवण्याच्या राजस्थान रॉयल्सच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

या स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स हा संघ गुणतालिकेत राजस्थानपेक्षा वरच्या क्रमांकावर आहे. तर राजस्थानचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. सांगायचे झाल्यास राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी फक्त 2 जिंकले आहेत. म्हणजेच 6 मध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

राजस्थान राॅयल संघाचे मुख्यप्रशिक्षक कोण आहेत?

राजस्थान रॉयल संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत.

राजस्थान संघावर मॅच फिक्चिंगचा आरोप होत आहे तो कुणी केला?

राजस्थान संघावर जो मॅच फिक्चिंगचा आरोप होत आहे तो जयदीप बिहाणी यांनी केला. जयदीप बिहाणी हे जस्थान क्रिकेट असोसिएशनच्या तदर्थ समितीचे निमंत्रक आणि श्रीगंगानगरचे आमदार आहेत.

राजस्थान रॉयल्सवर लखनऊ संघाने किती धावांनी विजय मिळवला?

राजस्थान राॅयलवर लखनऊ संघाने 2 धावांनी विजय मिळवला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+