Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 : 'गेज टेस्ट' काय आहे?, खेळाडूंच्या बॅट का होत आहेत फेल, मैदानात होतेय चेकिंग!

IPL 2025 : मंगळवारी मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2025 च्या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ला पंजाब किंग्ज (पीबीकेएस) विरुद्ध 112 धावांचे लक्ष्य मिळाले. पण या सामन्यादरम्यान एका अनोख्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जेव्हा केकेआरचे तीन खेळाडू - सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि अँरिच नॉर्टजे - बॅट गेज चाचणीत फेल झाले. त्यामुळे हे बॅट गेज टेस्ट काय आहे, ते केव्हापासून लागू झाले आणि त्याचा खेळाडूंवर कसा परिणाम होतो, यावर एक नजर टाकणार आहोत..!

IPl 2025

2017 पासून बॅट गेज प्रोटोकॉल लागू

मुळात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2017 मध्ये बॅटचा आकार तपासण्यासाठी बॅट गेज प्रोटोकॉल लागू केला. या नियमानुसार, खेळाची निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी आयपीएलमध्ये आता मैदानावरील गेज चाचणी नियमित करण्यात आली आहे.

बॅटचा आकार किती असावा, त्याची नियमावली?

आयसीसीच्या नियमांनुसार, बॅटची कमाल रुंदी 4.33 इंच, खोली 2.68 इंच आणि कडांची जाडी 1.61 इंचांपेक्षा जास्त नसावी. याशिवाय, बॅटची वाकण्याची मर्यादा 0.20 इंच निश्चित केली आहे. त्यामुळे या नियमात सदर खेळाडू बॅट मैदानावर घेऊन आला की नाही, याची तपासणी केली जात आहे. यावर आता काही खेळाडूंकडून नाराजी देखील व्यक्त केली जात आहे.

आता जाणून घ्या 'गेज टेस्ट' म्हणजे काय?

आयपीएलच्या सध्याच्या हंगामात पंचांनी मैदानावरच बॅटचा आकार तपासण्यास सुरुवात केली आहे. बॅटचा आकार तपासणे हा काही नवीन नियम नाही. पण पूर्वी ही चाचणी फक्त ड्रेसिंग रूममध्येच केली जात असे. तथापि, पॉवर-हिटिंगच्या या युगात अधिक सतर्क राहण्यासाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सामना अधिकाऱ्यांना आवश्यक असल्यास मैदानावर बॅटची कोणत्याही प्रकारची तपासणी करण्याची परवानगी दिली आहे.

KKRचे तीन फलंदाज टेस्टमध्ये फेल

जेव्हा सुनील नरेन आणि अंगकृष रघुवंशी फलंदाजीसाठी तयार होत होते, तेव्हा राखीव पंच सय्यद खालिद यांनी मैदानाबाहेर त्यांच्या बॅटची तपासणी केली. या दरम्यान, नरेनची बॅट गेजमध्ये बसली नाही आणि ती बदलावी लागली. तर रघुवंशीची बॅट पास झाली. नंतर, जेव्हा आंद्रे रसेल 11 व्या षटकात फलंदाजीसाठी आला. तेव्हा पंच सदर्शन कुमार यांनी त्याची बॅट तपासली, जी गेज चाचणीत फेल झाली. त्याचप्रमाणे, 15 व्या षटकात अँरिक नॉर्टजेची बॅट देखील तपासण्यात आली आणि ती देखील मानकांनुसार नव्हती. यामुळे खेळ काही काळ थांबला. बदली खेळाडू रहमानउल्लाह गुरबाज नॉर्टजेसाठी कायदेशीर बॅट घेऊन आला, पण रसेल पुढच्याच चेंडूवर बाद झाला आणि संपूर्ण संघ 15.1 षटकांत 95 धावांवर ऑल आऊट झाला.

बॅटची चाचणी यापूर्वीही घेण्यात आली होती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या या हंगामात सामन्यांदरम्यान मैदानावरील पंचांना नियमितपणे बॅटचा आकार तपासण्याचे निर्देश दिले आहेत. बॅटचा आकार मोजण्याची पद्धत नवीन नाही. पूर्वी, खेळाडू सामन्यापूर्वी किंवा सामन्याच्या आदल्या संध्याकाळी त्यांच्या बॅट तपासणीसाठी जमा करत असत. ही चौकशी यापूर्वी सार्वजनिक नव्हती. सहसा ते ड्रेसिंग रूममध्ये घडायचे.

या बदलामागील कारण काय होते?

"आम्ही डाव सुरू होण्यापूर्वी नेहमीच ड्रेसिंग रूममध्ये बॅट तपासायचो. खेळाडू त्यांचे बॅट सोपवत असत आणि तिथेच तपासणी केली जात असे, असे एका माजी पंचाने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

आता प्रश्न असा आहे की, एखाद्या खेळाडूने एक बॅट तपासणीसाठी सादर केली आणि मैदानावर दुसरी बॅट वापरली का? जर तसे असेल, तर हा नवीन नियम निश्चितच योग्य आहे. खेळाडू अनेकदा अनेक बॅट बाळगतात. वजन वेगवेगळे असू शकते, परंतु उंची, रुंदी (बॅटचा पुढचा भाग), खोली (ब्लेडचा मध्य) आणि कडा रुंदी आयसीसीने निश्चित केलेल्या मर्यादेतच राहणे आवश्यक आहे," असा पंचांनी दावा केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+