Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पंजाब टॉप- 2 मध्ये येऊनही आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचा रिकी पॉन्टिंगवर गंभीर आरोप

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सच्या कामगिरीवरून एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगवर गंभीर आरोप केले आहेत. तिवारींनी दावा केला आहे की, पॉन्टिंग भारतीय खेळाडूंना नजरअंदाज करत असून परदेशी खेळाडूंना संधी देत आहे. ज्यामुळे पंजाब किंग्स आयपीएल 2025 चा किताब जिंकण्याचा मार्ग अडचणीत येऊ शकतो. हा आरोप कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यानंतर करण्यात आला आहे, जो पावसामुळे रद्द झाला.

आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सध्या पंजाब किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी 9 सामन्यांमध्ये 5 विजय, 3 पराभव आणि 1 सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे प्रत्येकी 1 गुण मिळवला आहे.

Ricky Ponting

पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्या नेतृत्वाखाली संघाने यंदा प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे ते पहिल्या आयपीएल ट्रॉफीसाठी वाटचाल करताना दिसत आहेत. परंतु, मनोज तिवारी यांनी पॉन्टिंगच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, ज्यामुळे संघाच्या यशाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

पंजाब किंग्सचा कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धचा सामना 26 एप्रिल 2025 रोजी ईडन गार्डन्सवर खेळला गेला परंतु पावसामुळे हा सामना रद्द झाला. या सामन्यात पंजाबने प्रभसिमरन सिंगच्या 83 धावांच्या खेळीच्या जोरावर मजबूत सुरुवात केली होती. परंतु, पॉन्टिंगने बॅटिंग ऑर्डरमध्ये केलेल्या निर्णयांमुळे वाद निर्माण झाला आहे, ज्यावर मनोज तिवारींनी गंभीर आरोप केले आहेत.

मनोज तिवारीने काय केला आहे आरोप ?

मनोज तिवारी यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले की, "माझी अंतर्गत भावना म्हणते की पंजाबची टीम यंदा आयपीएल ट्रॉफी जिंकू शकणार नाही, कारण आज त्यांनी बॅटिंग करताना जे दिसले, त्यात कोचने भारतीय फॉर्ममधील फलंदाज नेहल वढेरा आणि शशांक सिंग यांना पाठवले नाही. त्याने परदेशी खेळाडूंवर विश्वास ठेवला, पण त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही आणि यातून भारतीय खेळाडूंवर विश्वासाअभाव दिसून आला." तिवारींनी पुढे म्हटले की, जर पॉन्टिंगने ही रणनीती कायम ठेवली, तर पंजाबचा संघ टॉप टू मध्ये स्थान मिळवले तरी आयपीएलची ट्रॉफी जिंकू शकणार नाही", असं म्हटलं आहे.

तिवारीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, पॉन्टिंगने प्रभसिमरन सिंगच्या बाद झाल्यानंतर 15व्या षटकात नेहल वढेरा किंवा शशांक सिंग यांना पाठवण्याऐवजी ग्लेन मॅक्सवेलला संधी दिली. मॅक्सवेलने मात्र फक्त 7 धावा काढल्या आणि त्याची कामगिरी निराशाजनक ठरली. तिवारींनी हेही नमूद केले की, वढेरा आणि शशांक सिंग हे सध्या फॉर्ममध्ये आहेत, तरीही त्यांना संधी नाकारली गेली, जे भारतीय खेळाडूंवर विश्वास दाखवला नाही", असं त्याने आपल्या पोस्टमधून गंभीर आरोप केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+