Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 : विराट कोहली- केएल राहुलमध्ये जोरदार वाद; 'कांतारा' स्टाईलची चर्चा, पहा व्हिडीओ

आयपीएलचा रविवारीचा सामना आरसीबी व दिल्ली कॅपिटल यांच्यात झाला. अरुण जेटली मैदानावर झालेल्या या सामन्यांत आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यांत विराट कोहली व केएल राहुल यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचा व्हिडीओत सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा वाद झाला त्यावेळी विराट कोहली बॅटिंग करत होता तर केअल राहुल हा यष्टीरक्षण करत होता. या वादाचे कारण समजू शकले नसले तरी, हे दोघेही चांगलेच लालबूंद झाले होते.

KL Rahul-Virat Kohli controversy

नेमकं काय झालं?

दिल्लीने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आठ गड्यांच्या मोबदल्यात १६२ धावा केल्या. प्रत्युत्तर आरसीबीच्या तीन बाद २६ झाला होत्या त्यावेळी हा वाद झाला. डावाच्या आठव्या षटकांत राहुल व विराट कोहलीमध्ये या वादाला सुरुवात झाली. समालोचक आकाश चोप्राने या वादाचा उल्लेखही केला. जेव्हा आरसीबीला ११५ धावांची गरज होती तेव्हा विराट फलंदाजी करत होता. त्याचवेळी राहुलच्या कोणत्यातरी वक्तव्याने विराटला राग आला. तो थेट राहुलकडे गेला. त्या दोघांमध्ये त्यावेळी जोरदार वादावादी झाली.

राहुलचा कांताराही गाजला

गेल्या सामन्यांत आससीबी व डीसी यांच्यात सामना झाला त्यावेळी राहुलचे कांतारा स्टाईल सेलीब्रेशन चांगलेच गाजले होते. जेव्हा दिल्ली जिंकली त्यावेळी त्याने खालू बसुन खुंटी ठोकल्याची अँक्शन केली. त्यानंतर त्या खुंटीला वर्तुळ काढले. या सेलिब्रेशनचा अर्थ त्याला विचारण्यात आला त्यावेळी त्याने आपल्या आवडत्या चित्रपट कांताराचे नाव घेतले. ही कांतारा स्टाईल होती, असे त्याने सांगितले. चिन्नास्वामी स्टेडिअम हे आपले घऱचे मैदान आहे. येथे आपल्याला कुणी पराभूत करु शकत नाही, असा त्या सेलिब्रेशनचा अर्थ असल्याचे राहुलने सांगितले होते.

विराट कोहलीने घेतला बदला

सामन्यानंतर विराट कोहली केएल राहुलकडे गेला आणि बेंगळुरूमधील विजयानंतर राहुलने जे केले होते तेच करण्याचा प्रयत्न केला. गेल्यावेळी बंगळुरुमध्ये दिल्लीने आरसीबीचा पराभव केला होता. तेव्हा राहुलने कांतारा सेलीब्रेशन केले होते. आता विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सला त्याच्या घरच्या मैदानावर हरवून बदला घेतला आहे. विराट कोहलीने ४७ चेंडूत ४ षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. ही विराट कोहलीची अर्धशतकांची हॅटट्रिक आहे. २०१६ नंतर विराट कोहलीने आयपीएलमध्ये सलग तीन अर्धशतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+