IPL 2025 Idc vs mi : दिल्ली-मुंबई सामना पावसामुळे रद्द झाल्यास आयपीएल प्ले-ऑफमध्ये कोण पोहचणार? वाचा
IPL 2025 dc vs mi : सिंदूर ऑपरेशन आणि भारत पाकिस्तान संघर्षानंतर पुन्हा सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धेत आता मोठी चूरस निर्माण झाली आहे. आता काही दिवसांत प्ले ऑफ फेरी होतील. त्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज पात्र ठरले आहेत. आता प्लेऑफ फेरीसाठी चौथ्या आणि शेवटच्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये स्पर्धा आहे.

आज दिल्ली आणि मुंबईत मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर सायंकाळी साडेसात वाजता सामना होणार आहे. या सामन्यावर पावसाची छाया आहे. जर हा सामना पावसामुळे वाया गेला तर दिल्लीला सर्वात मोठा फटका बसू शकतो. मुंबई आणि दिल्ली संघांसाठी प्लेऑफची परिस्थिती काय आहे? हे आधी जाणून घेऊया.
बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो अशी परिस्थिती आहे. त्यातचमुंबईतील हवामान अंदाजाने संपूर्ण समीकरण गुंतागुंतीचे केले आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या 13 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. जर त्यांनी मुंबईविरुद्धचा सामना जिंकला नाही (किंवा सामना रद्द झाला) तर त्यांचा मार्ग अत्यंत कठीण होईल.
मुंबईची स्थिती थोडीशी मजबूत
मुंबईची स्थिती थोडीशी मजबूत असल्याचे दिसते. मुंबई इंडियन्स सध्या 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, दिल्लीपेक्षा एक गुण पुढे आहे. जर डीसी विरुद्ध एमआय सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या नंतर मुंबईचे 15 गुण असतील आणि दिल्लीचे 14 गुण असतील.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास कुणाचे नुकसान?
जर सामना रद्द झाला तर दिल्लीला सर्वात जास्त नुकसान होईल. मुंबईला पंजाब किंग्जविरुद्धचा शेवटचा सामना जिंकण्याची आणखी एक संधी असेल, ज्यामुळे ते 17 गुणांसह थेट प्लेऑफमध्ये पोहोचतील. त्याचवेळी, जरी दिल्लीने पंजाबविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तरी त्यांचे फक्त 16 गुण राहतील. जर मुंबईने सामना जिंकला तर दिल्ली प्लेऑफमधून बाहेर पडेल. त्यामुळे, रद्द झालेल्या या सामन्यामुळे दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा कमकुवत होतील आणि मुंबईला फायदा होईल.
दिल्ली संघाला कशी आहे प्लेऑफची संधी?
जर दिल्ली विरुद्ध मुंबई संघातील सामना रद्द झाला, तर दिल्लीला त्यांचा शेवटचा सामना जिंकण्यासोबतच, दिल्लीला मुंबई पंजाबविरुद्ध हरावी अशी प्रार्थना करावी लागेल. याचा अर्थ असा की दिल्लीकडे आता स्वतःच्या मेहनतीपेक्षा नशिबावर त्यांचे प्लेऑफमधील स्थान अवलंबून आहे.
आज मुंबईतील हवामान कसे आहे?
हवामान विभागाने मुंबईत पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. AccuWeather च्या मते, बुधवारी पावसाची 80 टक्के आहे आणि दीड तास पाऊस पडू शकतो. रात्रीपर्यंत ही शक्यता 25 टक्क्यांपर्यंत कमी होत असली तरी हवामान इतके बदलत आहे की निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. शिवाय खेळपट्टी खूपच ओलसर असेल तर सामना रद्द होऊ शकतो.
आजचा सामना दोन्ही संघांना करा किंवा मरा असाच
आजचा सामना मुंबई आणि दिल्ली संघासाठी करा किंवा मरा असाच आही. जर पाऊस पडला आणि सामना झाला नाही तर मुंबईला दिलासा मिळू शकतो आणि दिल्लीसमोरील संकट वाढू शकते. आता आज संध्याकाळी पाऊस पडतो का आणि सामना रद्द होईल की, पुर्ण होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications