Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा, वाचा- कोणाला मिळाली संधी

Indian Team Announced For Test Series Against Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय संघाला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे, जिथे संघ 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघात अभिमन्यू ईश्वरन, हर्षत राणा व नितीश कुमार रेड्डी यांचा संघात समावेश झाला आहे.

rohit sharma  virat kohli

मिळालेल्या माहितीनुसार, बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेसाठी भारताने 18 सदस्य संघामध्ये अभिमन्यू ईश्वरन, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांची निवड केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. तसेच, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

तीन वर्षानंतर ऑस्ट्रेलियात जाणार भारतीय संघ

मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडिया तब्बल 3 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये तर दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाईल. टीम इंडियाने 2014 पासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. या काळात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने 2 मालिका जिंकल्या आहेत.

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी

भारताचा संघ:

  • रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैसवाल मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ

  • सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, आवेश खान, यश दयाल.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+