चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी, कुणाला बाहेरचा रस्ता..?

येत्या फेब्रुवारी महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सामने होतील. या स्पर्धेला टीम इंडियात कोण असेल, हे येत्या १२ जानेवारीला समजेल. मात्र त्यापूर्वी श्रीलंकेत दिव्यांग चॅम्पियन्स ट्राँफी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत १२ जानेवारीला टीम इंडियाला पहिलाच सामना पाकिस्तानसोबत खेळायचा आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात १७ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

Divyang Champions Trophy 2025

रोहितकडे नेतृत्व

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा १९ फेब्रुवारीला सुरु होणार आहे. त्यात भारतासह आठ संघ भाग घेतील. पाकिस्तान हा या स्पर्धेचा यजमान असला तरी, भारताचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत. या मुख्य स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा १२ जानेवारीला होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघात बरीच उलथापालथ पहायला मिळणार आहे. कर्णधार रोहित शर्मा सध्या फाँर्ममध्ये नसल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे. मात्र तरीही चॅम्पियन ट्राँफीसाठी रोहित शर्माच कर्णधार असेल, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. वन डे फाँर्मेटमध्ये रोहितच टीम इंडियाचा कर्णधार राहणार आहे.

दिव्यांग चॅम्पियन ट्राँफी

श्रीलंकेत 12 जानेवारीपासून दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या दिव्यांग संघाची घोषणा झाली असून, त्यात 17 खेळाडूंना संधी मिळाली आहे. भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेचे राष्ट्रीय निवड पॅनलने मुख्य प्रशिक्षक रोहित जलाने याच्या नेतृ्त्वात जयपूरमध्ये प्रशिक्षण शिबीर घेतलं होते. प्रशिक्षणानंतर खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा विक्रांत केनीच्या खांद्यावर आहे. उपकर्णधारपद रवींद्र सँटेकडे देण्यात आले आहे.

कसे आहेत टीम इंडियाचे सामने?

दिव्यांग चॅम्पियन ट्राँफीसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रोहित जलानी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'निवडण्यात आलेली संतुलित आहे. प्रत्येक सामना खेळण्यासाठी ती सक्षम आहे. भारत पाकिस्तान यांच्यात पहिला सामना 12 जानेवारीला होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 13 जानेवारीला इंग्लंडविरुद्ध, 15 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध, 16 जानेवारीला पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध, 18 जानेवारीला इंग्लंड आणि 19 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. अंतिम फेरीचा सामना 21 जानेवारीला होणार आहे.

अशी आहे टीम इंडिया

विक्रांत रवींद्र केनी (कर्णधार), रवींद्र गोपीनाथ सांते (उपकर्णधार), योगेंद्र सिंग (यष्टीरक्षक), अखिल रेड्डी, राधिका प्रसाद, देपेंद्र सिंग (यष्टीरक्षक), आकाश अनिल पाटील, सनी गोयत, पवन कुमार, जितेंद्र, नरेंद्र, राजेश, रवींद्र सिंग (यष्टीरक्षक). निखिल मनहास, आमिर हसन, माजिद मगरे, कुणाल दत्तात्रेय फणसे आणि सुरेंद्र.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+