'आम्ही घरी येत आहोत' रोहित शर्माने पोस्ट करुन दिली माहीती
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषकात इतिहास रचला. अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. भारत यापूर्वी 2007 मध्ये चॅम्पियन होता. मात्र, यावेळी विजेतेपद पटकावल्यानंतर खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागली.

बार्बाडोसमध्ये बेरिल चक्रीवादळामुळे खेळाडूंना मायदेशी परत येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता खेळाडूंना आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान बार्बाडोसला पोहोचले.
बार्बाडोस मधून विशेष विमानाने उड्डाण केले आहे आणि खेळाडू घरी परत येत आहेत. कॅप्टन रोहित शर्माने फ्लाइटमधील पहिला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, 'घरी येत आहे.' रोहितने सूर्यकुमार यादवसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
खेळाडूंना आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान बार्बाडोसला पोहोचले होते. बार्बाडोसमध्ये हे खेळाडू ३ दिवस अडकून पडले होते. त्याच्यासोबत बीसीसीआय सचिन जय शाह, कोचिंग स्टाफ आणि काही पत्रकार बार्बाडोसमध्ये होते.
#WATCH | Indian cricket team leave from Barbados. The team will reach Delhi on July 4, early morning.
— ANI (@ANI) July 3, 2024
The flight arranged by BCCI's Jay Shah is also carrying the members of Indian media who were stranded in Barbados pic.twitter.com/V0ScaaojBv
टीम इंडिया गुरुवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास दिल्लीला पोहोचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता टीम इंडीयाच्या खेळाडूंची भेट घेणार आहेत. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मुंबईतील खुल्या बस परेडमध्ये दिसू शकतात.












Click it and Unblock the Notifications