Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले: फायनलमध्ये चीनचा 1-0 असा पराभव

India vs China Hockey Final, India Won : भारताने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने चीनचा 1-0 असा पराभव केला.

हा सामना चीनमधील हुलुनबुर शहरातील मोकी हॉकी प्रशिक्षण केंद्रात खेळला गेला. भारताकडून सामन्यातील एकमेव गोल जुगराज सिंग याने घेतला. तर 4 क्वार्टरनंतरही चीनच्या संघाला गोल करता आलाच नाही.

पहिल्या क्वॉर्टरमध्ये बरोबरीत राहिला खेळ

भारत आणि चीन यांच्यातील आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीतील पहिला क्वार्टर बरोबरीत राहिला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक संधी निर्माण केल्या, मात्र चीनच्या बचावपटू आणि गोलरक्षकांनी चमकदार खेळ करत त्यांचे गोलमध्ये रूपांतर होऊ दिले नाही.8 व्या मिनिटाला अभिषेक सिंगने गोलवर थेट फटका मारला. परंतु, चायनाच्या गोलकीपरने अप्रतिम बचाव केला.

India Vs China

दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये स्कोअर 0-0

दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारत आणि चीनला एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये चीनच्या संघाने भारताला कडवी टक्कर दिली. या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला फार कमी संधी मिळाल्या, मात्र त्यांचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. चीनच्या बचावपटूंनी भारतीय हल्ल्याचा जोरदार सामना केला. त्यानंतर तिसरा क्वार्टरमध्येही गोलशून्य राहिला. या क्वार्टरमध्ये चीनच्या संघाने आक्रमक खेळ करत काही संधी निर्माण केल्या, मात्र भारतीय बचावपटूंनी चीनचे प्रयत्न हाणून पाडले.

चौथ्या क्वार्टरमध्ये जुगराजचा एकमेव गोल

अंतिम फेरीत भारतीय हॉकी संघाने चौथ्या क्वार्टरमध्ये पहिला गोल करत चीनवर 1-0 अशी आघाडी घेतली. चौथ्या क्वार्टरच्या 7व्या मिनिटाला जुगराज सिंगने भारतासाठी हा गोल केला. येथे कर्णधार हरमनप्रीतने अभिषेकला पास दिला, त्यानंतर जुगराजने डीच्या आत गोल केला. सामन्याच्या 56व्या मिनिटाला चीनने आपला गोलकीपर काढून भारतीय आघाडीची बरोबरी केली. मात्र चीनला गोल करण्यात अपयश आले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+