Ind w vs Eng w : भारतीय महिला टीमने T- 20 सामना जिंकला! इंग्लंडला हिसका; लाॅर्ड्स टेस्टचा घेतला बदला
India women vs England women T20 : एकीकडे भारतीय पुरुष संघ इंग्लडमध्ये चाचपडत असतानाच आता महिला संघाने इंग्लंडच्या महिला संघाविरुद्ध जोरदार यश मिळवले आणि पुरुष टीम इंडियाच्या कसोटीतील पराभवाचा बदला घेतला. इंग्लंडच्या महिला संघाला भारतीय महिला संघाने ४ गड्यांनी घरच्या मैदानावर मात दिली.
लॉर्ड्सवरील पराभवाचा घेतला बदला
लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघ फक्त २२ धावांनी विजयापासून वंचित राहिला. त्यात रविंद्र जडेजानेच इंग्लंडच्या गोलंदाजांना लढा दिला. आता या पराभवाचा महिला संघाने इंग्लडमध्येच टी-२० सामन्याच्या स्वरुपात बदला घेतला आहे.

दिप्ती शर्मा ठरली मॅचविनर
भारतीय महिलांनी इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. भारताच्या विजयात अष्टपैलू दीप्ती शर्माचा सर्वात मोठा वाटा होता. भारतीय महिला संघाने साउथहॅम्प्टनच्या रोझ बाउल मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला ४ विकेट्सने हरवले आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग पूर्ण केला. या सामन्यात दीप्ती शर्मा आणि क्रांती गौर यांनी अष्टपैलू कामगिरी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
इंग्लडविरुद्ध सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २५८ धावा केल्या होत्या. भारताने सलामीवीरांना लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवून चांगली सुरुवात केली. क्रांती गौरने दोन्ही सलामीवीरांना - टॅमी ब्यूमोंट आणि एमी जोन्सला - नवीन चेंडूने बाद केले. त्यानंतर स्नेह राणाने आणखी दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर आणले, त्यानंतर सोफिया डंकले (८३ धावा) आणि अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स (५३ धावा) यांनी अर्धशतकी खेळी खेळली आणि ब्रिटीश संघाला सांभाळले.
इंग्लंडने ५० षटकांत ६ विकेट्स गमावून २५८ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघानेही जोरदार खेळ केला. स्मृती मानधनाने २८ धावा केल्या, तर प्रतीका रावल आणि हरलीन देओल चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. कर्णधार हरमनप्रीत कौरही लवकर बाद झाली. एकेकाळी भारताची स्थिती गंभीर दिसत असतानाच दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी डाव सांभाळला. रॉड्रिग्ज ४८ धावा काढल्यानंतर बाद झाली, पण दीप्ती शेवटपर्यंत उभी राहिली.
दिप्तीने ६२ धावांची नाबाद खेळी खेळली आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग करणाऱ्या डावाचा विक्रम केला. शेवटी, अमनजोत कौरने १४ चेंडूत जलद २० धावा केल्या आणि विजय मिळवून दिला.












Click it and Unblock the Notifications