भारतीय महिला संघ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत, आता दक्षिण आफ्रिकेशी करणार सामना
India Women vs England Semifinal: भारताच्या अंडर-19 महिला संघाने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज शुक्रवारी क्वालालंपूर येथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडचा 9 विकेट्सने पराभव करून 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता अंतिम सामना 2 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.
विजयासाठी 114 धावांचे लक्ष्य गाठताना भारताने पाच षटके शिल्लक असताना हे लक्ष्य गाठलं आहे. आता अंतिम सामन्यात त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. त्याआधी पारुनिका सिसोदियाच्या उत्कृष्ट स्पेलमुळे भारताने इंग्लंडला 113/8 धावांवर रोखले.

भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंड संघाने गुडघे टेकले
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अंतिम सामन्यात डेव्हिना पेरिनने संघाला चांगली सुरुवात करून दिली. सिसोदिया आणि आयुषी शुक्लाने इंग्लंडची फलंदाजी उध्वस्त करण्यापूर्वी इंग्लंड संघाची पॉवरप्लेमध्ये 37/0 धावा संख्या होती. डेव्हिना पेरिनने 40 चेंडूत 45 धावा केल्या. कर्णधार अबी नॉरग्रोव्हनेही 25 चेंडूत 30 धावा करत इंग्लंडने तिहेरी आकडा गाठला.
इंग्लंड महिला संघ: डेव्हिना पेरिन, जेमिमा स्पेन्स, ट्रुडी जॉन्सन, अबीगेल नॉरग्रोव्ह (कर्णधार), शार्लोट स्टब्स, केटी जोन्स (यष्टीरक्षक), प्रीशा थानावाला, अमरुथा सुरेनकुमार, शार्लोट लॅम्बर्ट, टिली कोर्टीन-कोलमन, फोबी ब्रेट.
भारत महिला -19 वर्षांखालील संघ: कमलिनी जी (विकेटकीपर), त्रिशा गोंगाडी, सानिका चालके, निकी प्रसाद (कर्णधार), ईश्वरी आवासरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, शबनम, वैष्णवी शर्मा, जोशिता व्ही जे, पारुनिका सिसोदिया.












Click it and Unblock the Notifications