एक, दोन नाही... टीम इंडियाने सोडले 11 कॅच; फायनल मॅचमध्ये तर कळसच केलाय...
टीम इंडियाने त्यांच्या कामगिरीतील सातत्य कायम ठेवले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत टीम इंडियाने दिमाखात प्रवेश केला. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. फिल्डींगची चांगली केली मात्र यासंपूर्ण सिरीजमध्ये भारतीय संघाने एक, दोन नाही तर तब्बल ११ कॅच ड्राँप केले. झेल सोडण्याचे प्रकार भारतीय टीमने अंतीम सामन्यांतही कायम ठेवल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

अंतिम सामन्यांत ४ कॅच ड्राँप
दुबईत आज रविवार न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना सुरु आहे. टीम इंडियाकडून या सामन्यांत क्षेत्ररक्षणात सुधारणा होण्याची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. ग्राउंड फिल्डिंग चांगले दिसत असतानाच झेल पकरण्यात मात्र भारतीय खेळाडूंनी कसर केली. भारतीय खेळाडूंनी त्यांच्या हातावर बटर लावल्यासारखे पटापट कॅच ड्राँप केले. अंतिम सामन्यातही कोणतीही सुधारणा झाली नाही; खरं तर, भारतीय खेळाडूंनी त्यांची आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी केली आणि ४ झेल सोडले.
कुणी कुणी सोडले झेल
अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या चार वेगवेगळ्या खेळाडूंनी झेल सोडले. त्यात टीमचा कर्णधार रोहित शर्माचा समावेश होता. डावाच्या सातव्या षटकात स्वतःच्याच गोलंदाजीवर रचिन रवींद्रचा झेल सोडून मोहम्मद शमीने झेल सोडण्याचा श्रीगणेशा केला. पुढच्याच षटकात रचिनला आणखी एक जीवनदान मिळाले. यावेळी चूक संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या श्रेयस अय्यरने केली. त्याने ८ व्या षटकात वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर रचिनचा झेल सोडला. यानंतर रचिनने काही मोठे फटके मारले पण कुलदीपने त्याचा डाव संपवला.
कर्णधारानेही सोडला झेल
३५ व्या आणि ३६ व्या षटकातही टीम इंडियाने सतत झेल सोडले. अक्षर पटेलच्या पहिल्याच षटकात कर्णधार रोहित शर्माने डॅरिल मिशेलचा एक कठीण झेल सोडला. त्याने एका हाताने ते उचलण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. मिशेल त्यावेळी ३८ धावांवर होता आणि ६३ धावा करून बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात, शुभमन गिलने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चौकाराच्या जवळ ग्लेन फिलिप्सला जीवदान दिले. तथापि, फिलिप्स २ षटकांतच बाद झाला.
बनला सर्वाधिक झेल सोडणारा संघ
टीम इंडिया २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक झेल सोडणारा संघ बनला. या स्पर्धेत टीम इंडियाने एकूण ११ झेल सोडले. प्रत्येक सामन्यात भारतीय संघाने विरोधी फलंदाजांना जीवदान दिले. अंतिम सामन्यात, भारतीय संघाने केवळ ४ झेल सोडले नाहीत तर रवींद्र जडेजाच्या थ्रोवर कुलदीप यादवने स्टंपजवळ येऊन चेंडू पकडण्याऐवजी काही अंतरावर उभे राहून चेंडू पाहिला तेव्हा रनआउटची संधीही गमावली.












Click it and Unblock the Notifications