India vs england : भारत कसोटी जिंकणार की हरणार? या बॅट्समनने केलेली ही चूक भारताला पडू शकते महागात!
India vs england third test fourth day updatest : भारत आणि इंग्लड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात आता रोमांचक वळण आले आले आहे. दोन्ही संघांनी पहिल्या डावात सारख्याच धावा केल्या त्यानंतर इंग्लंडचा संघ भारताने स्वस्तात गुंडाळला तर भारतावरही तिच नामुष्की येत आहे. त्यामुळे आता तिसरा कसोटी सामना कोण जिंकेल हा यक्ष प्रश्न आहे, तर दुसरीकडे आज चौथ्या दिवसाच्या खेळातच कोण जिंकणार हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे. कारण आजच सामना एक तर भारत संपवेल किंवा इंग्लड..

भारत जिंकणार की हरणार?
लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी पकड मिळवूनही, टीम इंडियाला आता पराभवाचा सामना करावा लागू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. इंग्लंडने भारताला १९३ धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु शेवटच्या सत्रात दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने भारतीय संघाला एकामागून एक चार धक्के दिले. त्यामुळे किमान ८० धावा जरी काढल्या तरी भारत जिंकण्याच्या वाटेवर असेल असे वाटते पण तशी शक्यता इंग्लंडचे गोलंदाज धुळीस मिळवू शकतात हेही महत्वाचे आहे.
भारतीय फलंदाजांची बेजबाबदार खेळी
भारताला केवळ १९३ धावांचे लक्ष आहे पण भारताने आपल्या चार विकेट्स अवघ्या ५८ धावांच्या आतच पडल्या, त्यातच केएल राहुलने शेवटच्या सत्राच्या शेवटच्या षटकात मोठी चूक केली, ज्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. केएल राहुलच्या या चुकीबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. राहुलने कदाचित विचार केला नसेल की निकाल काय असू शकतो.
काय केली केएल राहुलने चूक?
खरंतर, दिवसाच्या शेवटच्या षटकात केएल राहुलकडे स्ट्राईक होता आणि त्याच्यासमोर नाईट वॉचमन आकाश दीप खेळत होता. बेन स्टोक्स हे षटक टाकत होता. स्टोक्सने पहिला चेंडू राहुलला टाकला आणि त्याने एक सिंगल घेतला आणि आकाश दीपला स्ट्राईक दिला. इथे राहुलने चूक केली. हे दिवसाची शेवटची षटक होते आणि राहुलला तिथेच उभे राहावे लागले पण त्याने आकाश दीपला स्ट्राईकवर आणून इंग्लंडचे काम सोपे केले. षटकाच्या चौथ्या चेंडूवर आकाश दीपला बेन स्टोक्सने बाद केले, ज्यामुळे भारताला चौथा धक्का बसला. आता शेवटच्या दिवसाच्या सामन्यात भारतावर दबाव येणार आहे.
भारताला १३५ धावांची तर इंग्लंडला विजयासाठी हव्या ६ विकेट्स
आता भारताला विजयासाठी आणखी १३५ धावा करायच्या आहेत. तर इंग्लंडला ६ विकेट घ्यायच्या आहेत. के. एल. राहुलने जी चूक केली तशीच पहिल्या डावात भारताबाबत घडली.ले ऋषभ पंतच्या बाबतीत राहुलनेही अशीच चूक केली. पहिल्या डावात तो लंचपूर्वी त्याचे शतक पूर्ण करू इच्छित होता, या दरम्यान पंतला धावण्यास सांगण्यात आले आणि भारताला धावबाद होण्याच्या स्वरूपात मोठा धक्का बसला. आता आकाश दीपच्या बाबतीत, राहुलने तसेच काहीसे केले.
भारत आणि इंग्लड स्कोअरकार्ड
इंग्लंड १९२ धावांवर आटोपल्यानंतर भारताचा डाव कोसळला, टीम इंडियाला ४ धक्के सहन करावे लागले असून इंग्लंडला १९२ धावांवर आटोपण्यात वॉशिंग्टन सुंदरने मोठी भूमिका बजावली,त्याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ४ बळी घेतले.आता त्याच्या मेहनतीवर पाणी फेरले जाऊ नये.सध्या दोन्ही संघ एक विरुद्ध एक अशा बरोबरीत आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications